Other तंत्रज्ञान

बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची नव्या ‘अवतारात’ एन्ट्री

बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची भारतात नव्या ‘अवतारात’ एन्ट्रीचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्ट्सनुसार त्यात चिनी अ‍ॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जनही आहेत.

काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारनं काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची नव्या ‘अवतारात’ एन्ट्री चा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अ‍ॅप स्टोअरवर चिनी अ‍ॅप्सची संख्याही वाढताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार त्यात चिनी अ‍ॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जनही आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सुरूवातीला केंद्र सरकारनं टिकटॉकसहित ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ४७ आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ११८ अ‍ॅप्स बॅन करण्यात आली होती.

बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्स ची नव्या ‘अवतारात’ एन्ट्री

रिपोर्टमध्ये काही अशा अ‍ॅप्सबद्दलही सांगण्यात आलं आहे जी नावं बदलून पुन्हा भारतात आली आहेत. उदाहरण पाहायचं झाल्यास स्नॅक व्हिडीओ हे अ‍ॅप टेन्सेंटच्या kuaishou या चिनी कंपनीनं तयार केलं आहे. विशेष बाब ही की अ‍ॅप एकमद Kwai या अ‍ॅपप्रणाणे दिसतं.

हे अ‍ॅप सरकारनं बॅन केलं होतं. स्नॅक व्हिडीओला गुगल प्ले स्टोअरवर १० कोटींपेक्षा अधिक डाउनलोड्स मिळाले आहे. इतकंच नाही तर या अ‍ॅपमध्ये टिकटॉकसारखेही फिचर्स देण्यात आले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दुसऱ्या अ‍ॅपबद्दल सांगायचं झाल्यास भारतात Hago हे अ‍ॅप बॅन करण्यात आलं. याद्वारे अनोळखी लोकांसोबत चॅट रूम तयार करणं आणि गेम्स खेळण्याची सुविधा मिळत होती. आता त्या अ‍ॅपची जागा Ola Party नावाच्या एका अॅपनं घेतली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या मते या अ‍ॅपमध्ये गेम खेळण्याची सुविधा मिळत नसली तरी Hego अ‍ॅप युझर्सच्या प्रोफाईल, फ्रेन्ड्स आणि चॅट रूम्स यात इंपोर्ट करण्यात आल्या आहे. त्या युझर्सना थेट Ola Party या अ‍ॅपवर साईन इन करता येणार आहे.

सरकार काय उचलणार पाऊल ?

नव्या रूपात आलेल्या चिनी अ‍ॅप्सबद्दल प्रश्न विचारल्यानंतर यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना दिली. “जर असं काही होत असेल तर त्यावर आम्ही नक्कीच कठोर पावलं उचलू. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणतंही बॅन करण्यात आलेलं चिनी अ‍ॅप नव्या रूपात उपलब्ध होऊ दिलं जाणार नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

MumUni School of Thoughts तर्फे प्रा चौधरी यांचे अंतर्मुख करणारे व्याख्यान

Team webnewswala

पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

Team webnewswala

Leave a Reply