Team WebNewsWala
शहर समाजकारण

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गरेलपाडा गावात वीज

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे प्रभावित झालेल्या ऊर्जा विभाग भरती मधील SEBC प्रवर्गाच्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे

शहापूर : विज्ञान-तंत्रज्ञानात भारताने मोठी झेप घेतली असली तरी शहापूर तालुक्यातील गरेलपडा गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षांनी वीज पोहोचली असून गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावात वीज नसल्याने अनेक अचडणींना सामोरे जावे लागत होते. गावातील विद्यार्थ्यांना रात्री दिव्याच्या अंधारातच अभ्यास करावा लागत होता. याची दखल घेत शहापूर उपविभागाचे उपकार्यकरी अभियंता अविनाश कटकवार यांच्या उत्तम नियोजनाखाली वीज पोहोचवण्याचं काम करण्यात आलं.

९० घरांच्या वस्तीला वीज पुरवठा

अतिदुर्गम भागात जंगलाने तसेच तानसा तलावाच्या परिसरात व्यापलेल्या गरेलपाडा येथे विद्युतीकरण करण्यासाठी तीन किलोमीटर एच टी लाईन तसेच १.३५ किलोमीटर एल टी लाईन टाकण्यात आली. अनेक वर्षे अनेक तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले होते. मात्र कटकवार यांनी पुढाकार घेत कल्पक बुद्धीने सर्व अडचणी दूर करून ९० घरांच्या वस्तीला वीज पुरवठा सुरू केला.

कल्याण परिमंडळचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, कल्याण मंडळ अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर काम पूर्ण करण्यासाठी शहापूर ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता सुरज आंबूर्ले व सतिष इलेक्ट्रिकल इंजिनियर्स या एजन्सीने विशेष मेहनत घेतल्याचे कटकवार यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका

Web News Wala

मालवण स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध

Team webnewswala

चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी

Team webnewswala

Leave a Reply