Team WebNewsWala
ऑटो शहर

वांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम

वांद्रे कुर्ला संकुलात अपुरी पडणारी सार्वजनिक वाहतुक पाहता या भागात ट्राम चालवण्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम

Webnewswala Online Team – सुकर व जलद वाहतुकीसाठी पुन्हा आधुनिक प्रकारातील ट्राम चालवण्याचा पर्याय पुढे आला आहे. वांद्रे कुर्ला संकुलात वाढत जाणारी कार्यालये आणि अपुरी पडणारी सार्वजनिक वाहतुक पाहता या भागात ट्राम चालवण्यासाठी एमएमआरडीएने (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) पुढाकार घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएकडून सल्लागार नियुक्त करण्यात आला असून त्याचा अभ्यास लवकरच सुरु करुन अहवाल सहा महिन्यात मिळणार आहे. ती मेट्रो मार्गिकांनाही जोडण्याचे नियोजन असणार आहे.

ट्राम सुकर व जलद वाहतुकीचा पर्याय

गेल्या काही वर्षात वांद्रे कुर्ला संकुलात मोठ्या प्रमाणात कार्यालयेही उभी राहिली. त्यामुळे दररोज वांद्रे कुर्ला संकुल व परिसरात येणाऱ्यांची संख्या अधिक असते. कुर्ला स्थानक किंवा वांद्रे पूर्व स्थानकात उतरुन अनेक जण संकुलात कामानिमित्त येतात. त्यामुळे सुकर व जलद वाहतुकीचा पर्याय शोधला जात आहे.

नवी दिल्लीतील सल्लागाराची नियुक्ती

या परिसरात स्वयंचलित जलदगती प्रणाली राबवण्याकरीता तांत्रिक व आर्थिक अभ्यास तयार करण्याकरीता नवी दिल्लीतील एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचे एमएमआरडीकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून या भागात नवीन व पर्यायी वाहतुकीचा अभ्यास केला जाईल. यात ट्राम किंवा अन्य वाहतुकीचा विचार केला जाऊ शकतो.

मेट्रोंना नवीन वाहतुक सेवा जोडण्याचा प्रयत्न

वांद्रे कुर्ला संकुल आणि संकुलातील मेट्रो स्थानकांना ट्राम जोडतानाच संकुलातील रहिवाशी आणि इतर व्यावसायिक इमारतींना जोडण्यात येईल. ही प्रणाली पर्यावरणस्नोही, कार्बन विरहित उत्सर्जन असणारी असेल. यामुळे होणारा आवाजही खूपच कमी असणार असल्याचे स्पष्ट केले.

या मेट्रोंना नवीन वाहतुक सेवा जोडण्याचा प्रयत्न  ’मेट्रो मार्गिका-२ बी- डी.एन.नगर ते मंडाले (वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला येथून जाणारी आहे)

’मेट्रो मार्गिका-३ कुलाबा ते सीप्झ (यात पहिला टप्पा सीप्झ ते वांद्रे कुर्ला संकुल आहे, तर दुसरा टप्पा वांद्रे कुर्ला संकुल ते कुलाबा आह

ट्रामचा इतिहास…

९ मे १८७४ रोजी घोड्याची ट्राम वाहतुक असणारे मुंबईतले पहिले ट्रॅम फाटे सुरु झाले. एक कुलाबा ते क्रॉफर्ड  मार्केट मार्गे पायधुणीपर्यंत आणि दुसरा बोरीबंदरपासून काळबादेवी मार्गे पायधुणीपर्यंत. त्यानंतर कु लाबा ते क्रॉफर्ड  मार्केट हा विजेचा पहिला ट्रॅमचा फाटा ७ मे १९०७ ला सुरु करण्यात आला. पुढच्या दोन ते तीन महिन्यातच नवीन ट्राम बोरीबंदर ते जे.जे.रुग्णालय व जे.जे ते राणीचा बाग धावली.  मार्च १९६४ ला बोरीबंदर ते दादर असा ट्रामचा अखेरचा प्रवास झाला.

जलद व सुकर प्रवासासाठी 

वांद्रे कुर्ला संकुल व परिसरात ट्रामबरोबरच लाईट रेल किंवा पॉड रेलचाही पर्याय शोधला जात आहे. वांद्रे तसेच कुर्ला रेल्वे स्थानकाला जोडतानाच भविष्यातील मेट्रो मार्गिका २ व मेट्रो मार्गिका ३ यांनाही जोडता येतो का ते पाहिले जाईल. -आर.ए.राजीव , आयुक्त एमएमआरडीए

Title – वांद्रे-कुर्ला संकुलात लवकरच पर्यावरणस्नेही ट्राम ( Eco-friendly tram soon in Bandra-Kurla complex )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

प्रगतिशील शेतकऱ्यांकडून ऑर्किड लागवडीचा प्रयोग यशस्वी

Team webnewswala

केशरी कार्डधारकांना जून च्या अन्नधान्याचे वितरण

Web News Wala

भाडेवाढीचा मिटर डाऊन, मुंबईत रिक्षा टॅक्सी ची भाडेवाढ

Web News Wala

Leave a Reply