Team WebNewsWala
Other धर्म पर्यावरण शहर समाजकारण

मातृसेवा फाऊंडेशन मार्फत ठाण्यात वृक्षबंधन सोहळा

Eco friendly Rakshabandhan ceremony celebrated in Thane with the slogan of tree conservation

वृक्षसंवर्धनाचा नारा देत मातृसेवा फाऊंडेशन मार्फत ठाण्यात अनोखा वृक्षबंधन सोहळा साजरा

आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहतो , पण त्याचे महत्व जाणत नाही. वृक्ष आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याबरोबर ऑक्सिजन पुरवायला मदत करतात पण आपण त्यांना जपण्यासाठी काय करतो ?

हे भावी पिढीला आज शिकवले नाही तर वीस एक वर्षांनी मुलांना झाडांची ओळख करून द्यायला संग्रहालयात न्यायला लागेल ह्या भावनेने संध्या (सामंत ) सावंत ह्यांनी ठरवले की झाडांची ओळख आणि किंमत मुलांपर्यंत पोचवायची.

स्वतः बनवलेल्या राख्या स्वतः लावलेल्या झाडांना बांधण्याची अनोखी संकल्पना

म्हणूनच त्यांनी तीन वर्षांपूर्वी मातृसेवा संस्थेमार्फत शाळाशाळांत जाऊन विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. त्यांनी ठाण्यातील काही शाळांमध्ये मुलांना सोबत घेऊन बागा तयार केल्या. त्याचबरोबर मातृसेवा च्या सहकाऱ्यांनी मुलामुलींना दोघांनाही राख्या बनवायला शिकवल्या आणि स्वतः बनवलेल्या राख्या स्वतः लावलेल्या झाडांना बांधण्याची अनोखी संकल्पना सुरु केली. त्यांचा हा मुलांसाठी आणि मुलांसोबत चा हा वृक्षबंधन उपक्रम सतत तीन वर्षे सुरु आहे.

रक्षाबंधना दिवशी करोना संकटामुळे ह्यावर्षी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी करणे शक्य नव्हते. परंतु मातृसेवा च्या छोट्या सहकार्यांना सोबत घेऊन आजचे वृक्षबंधन तेवढ्यात उत्साहात पार पाडले.
संध्या सामंत – मातृसेवा फाऊंडेशन

Eco friendly Rakshabandhan

भावी पिढीला निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देत आपली संस्कृती जपणे

गेल्या आठवड्यातच मानपाडा ठाणे येथील रोडसाईडला त्यांनी देशी वृक्षांची लागवड केली होती. त्या झाडांना आज रक्षण करण्याची शपथ घेऊन राख्या बांधण्यात आल्या. मातृसेवाचे सहकारी त्यांनी लावलेल्या सर्व झाडांची निगा स्वतः राखतात. झाडे लावा पण त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे झाडे जगवा असं मातृसेवाच्या सहकाऱ्यांचे मत आहे.

पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते भावी पिढीला निसर्ग संवर्धनाचे महत्व पटवून देत आहेत हेच म्हणजे आपली संस्कृती जपणे आणि सण साजरे करणे असं म्हणावं लागेल.

आपणही मातृसेवा फाऊंडेशन च्या पेज ला भेट देऊन त्यांच्या उपक्रमाबद्दल जाणुन घेऊ शकता

Eco friendly Rakshabandhan ceremony celebrated in Thane with the slogan of tree conservation

मातृसेवा फाऊंडेशन

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

धनप्राप्ती चे अचुक उपाय पैसा हवा आहे मग हे करा

Team webnewswala

इराणी चलन गाळात; एका डाॅलरसाठी पाउणे तीन लाख रियाल

Team webnewswala

Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान

Team webnewswala

1 comment

गणेशोत्सवातील महत्वाची गोष्ट माटी बद्दल घ्या जाणुन - Web News Wala August 21, 2020 at 7:18 pm

[…] वृक्षसंवर्धनाचा नारा देत ठाण्यात अनो… […]

Reply

Leave a Reply