Team WebNewsWala
राष्ट्रीय समाजकारण

Ease of Living Index Ranking 2020 जाहीर

केंद्रीय मंत्रालयाने Ease of Living Index Ranking 2020 केली जाहीर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांत बंगळुरू, पुणे, अहमदाबाद
Ease of Living Index Ranking 2020 जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रालयाने गुरुवारी Ease of Living Index Ranking 2020 ची यादी जाहीर केली आहे. यात 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत बंगळुरू पहिल्या स्थानावर, पुणे दुसऱ्या स्थानावर तर अहमदाबाद तिसऱ्या स्थानावर आहे.

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने आज देशातील सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. या शहरांच्या यादीत 10 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरात बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे तर याच यादीत मुंबई ही दहाव्या स्थानावर आहे. मात्र यात महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली बाजू अशी की या यादीत राज्यातील तीन मोठी शहरं आहेत.

या यादीत महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई (सहाव्या स्थानावर), मुंबई (दहाव्या स्थानावर)

तर दहा लाखाखालील लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील एकही शहर नाही. या यादीत शिमला पहिल्या, भुवनेश्वर दुसऱ्या व सिल्वासा हे तिसऱ्या स्थानावर आहेत.

असे झाले सर्वेक्षण

या सर्वेक्षणासाठी सरकारकडून 14 कॅटेगरी बनवल्या होत्या. त्यात शहराचा शैक्षणिक विकास, आरोग्य सोयी सुविधा, राहण्यासाठी कितपत योग्य आहे, आर्थिक विकासाचा स्तर, ट्रान्सपोर्ट, स्वच्छता, पर्यावरण, रोजगाराची संधी, हरित क्षेत्र, इमारती, प्रदुषण याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात 32 लाख 20 हजार लोकांनी त्यांचे मत नोंदवले. या सर्वेक्षणात 111 शहरांनी सहभाग घेतला होता.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

महाड दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

मोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर

Web News Wala

Railofy च्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची माहिती Whats App वर

Web News Wala

Leave a Reply