Team WebNewsWala
राष्ट्रीय

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले, इमारतींना तडे

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले, पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. आसामच्या सकाळी ७ वाजून ५५ वा लागोपाठ दोन झटके
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले, इमारतींना तडे

आसाम – आसामसह पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. आसामच्या सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. आसामच्या मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल हे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ बसलेला झटका ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

सामला भूकंपाचा मोठा झटका बसला आहे. सर्वजण सुखरूप असतील अशी मी प्रार्थना करतो आणि नागरिकांनी सतर्क राहावं. सर्व जिल्ह्यांचा आढाव घेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सोनवाल यांनी दिली. भाजपाचे आसाममधील नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनीही ट्विट करून भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याची माहिती दिली. शर्मा यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत.

आसाम, अरुणाचल प्रदेशबरोबरच उत्तर बंगालमध्येही भूकंपाचे झटके

अरुणाचल प्रदेशचे डीआयजीपी मधूर वर्मा यांनीही भूकंपासंदर्भात ट्विट केलं आहे. इटानगरमध्येही मोठ्या तीव्रतेचे झटके जाणवले असून, घरं पूर्ण हादरली होती. जवळपास ३० सेंकद भूकंपाचे झटके जाणवले. कुठलीही जीवितहानी झाली नसून, सर्वांच्या सुरक्षेसाठी आपण प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एनडीआरएफने दिलेल्या माहितीप्रमाणे गुवहाटी आणि तेजपूरमधील इमारतींना तडे गेले आहे. मात्र, सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आसाम, अरुणाचल प्रदेशबरोबरच उत्तर बंगालमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. जवळपास ३० सेंकद हादरे जाणवल्याचं वृत्त आहे.

Title – भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले, इमारतींना तडे ( earthquake in assam area )

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Lockdown अटी होणार शिथिल; मॉल, सिनेमागृह होणार सुरू

Web News Wala

अ‍ॅपल प्रकल्पात टाटांची पाच हजार कोटींची गुंतवणूक

Team webnewswala

राज्याचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर 3 महिन्यात प्रथमच कमी रुग्ण

Web News Wala

Leave a Reply