Team WebNewsWala
ऑटो शहर

इंधन दरवाढीमुळे पुणेकरांची पसंती e Scooter ला

पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत e Scooter खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. प्रदूषण विरहित, पर्यावरण करासह विम्यामध्येही सवलत.

इंधन दरवाढीमुळे पुणेकरांची पसंती e Scooter ला

पुणे – पेट्रोल-डिझेल महागले तरी चिंता करण्याचे कारण नाही. सध्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत e Scooter खरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. प्रदूषण विरहित, वजनाला हलके-फुलके वाहन, त्याचबरोबर पर्यावरण करासह विम्यामध्येही सवलत नागरिकांना मिळत आहे. ‘चार्जिंग करा अन् मेटंनन्सचं टेन्शन न घेता बिनधास्त फिरा,’ एवढे सर्व ई वाहनांपाठीमागे चालकांना मिळू लागले आहे. परिणामी, दोन वर्षांत शहरात e Scooter व्रिकीचा वाढता आलेख पाहता ई-वाहनांची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे.

e Scooter काय आहेत फायदे ?

देखभाल-दुरुस्ती खर्च अत्यल्प
चार्जिंग करा अन्‌ बिनधास्त फिरा
ऑन रोड रेंज ६० ते १२० किलोमीटर स्पीड
प्रती तास ६५ ते ८५ किलोमीटर स्पीड
टीन एजरला चालविण्यासाठी सुयोग्य
प्रदूषण विरहित
कर व विम्यामध्ये सवलत
आकर्षक डिझाइन
नामांकित कंपन्याची उडी
टाइम लीड, लिथिअम आयर्न बॅटरी क्षमता
पॉवर फ्लोसाठी कंट्रोलर
पेट्रोलच्या तुलनेत रनिंग कॉस्ट कमी
आवाजाची पातळी अत्यंत कमी
काय आहे ई बाइक

e Scooter मध्ये तोट्यापेक्षा फायदे अधिक

वाहनांचे रनिंग पेट्रोलच्या तुलनेत १/१० हिस्सा
हायस्पीड आणि प्रिमिअर दुचाकी १०० ते ११० किलोमीटरपर्यंत सिंगल फेज चार्जिंगवर
काही काळात शहरात ई बाइकचे जाळे विस्तारणार
चाकण व तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांती स्पेअर पार्टमध्ये गुंतवणूक
ई वाहनांचे गिअर व ब्रेक इतर वाहनांप्रमाणेच
ई बाईक इतर वाहनांप्रमाणेच एक मीटर पाण्यात बुडाल्यासही अडचण नाही
वाहनांचे सस्पेंशन उत्तम
बहुतांश वाहनांना आयपी ६७, आयपी ६८ चे वॉटर प्रूफ रेटिंग

e Scooter काय आहेत तोटे ?

पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत
लांबच्या पल्ल्यासाठी अयोग्य
सध्या सिंगल फेजवर चार्जिंग
चार्जिंगचा कालावधी पाच ते सहा तास
अवजड वाहनांना पिकअप कमी
बॅटरीचा दर्जा अपेक्षित नाही

► ई वाहनांची सद्यःस्थिती

इलेक्ट्रीक वाहनांमध्ये सध्या टेक्नॉलॉजी अद्ययावत होत असल्याने ई-वाहन प्रेमींमध्ये धाकधूक
पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे नागरिकांचा कल ई वाहनांकडे अधिक
व्यवसायासाठी तसेच नियमित नोकरदारवर्गाला अधिक पसंती
महाराष्ट्रात १५४ प्रकारांमध्ये इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध
पंचवीस हजारांपासून वाहनांच्या किमती उपलब्ध
वाहनांची आरटीओकडे वाहन नोंदणी व वाहन परवाना गरजेचा

e Scooter मागणीत वाढ

शहरात सध्या ई बाइकची मागणी वाढत आहे. बाजारात आमच्या अजून बाईक येत आहे. आमची हैदराबाद बेसड् कंपनी आहे. दिवसाला चार ते पाच ई स्कूटर विकल्या जात आहेत. बॅटरी पण चांगल्या विकसित केलेल्या आहेत. साडेतीन ते चार तास चार्जिंग केल्यानंतर १०० ते १२० किलोमीटरपर्यंत स्कूटर चालते. डीसी मोटार आहे. मेंटेनन्ससाठी देखील चांगल्या कुशल व्यक्ती मागविलेल्या आहेत. सध्या माझ्याकडे ६० व २५ प्रती किलोमीटर अशा दोन रेंजमधल्या दुचाकी आहेत.

रोहित पानसरे, इलेक्ट्रिक दुचाकी डीलर

माझ्या दुचाकीला पिकअप चांगला आहे. पेट्रोल डिझेलप्रमाणेच ई वाहने पॉवरफुल आहेत. दररोज ९० किलोमीटर मी गाडी चालवतो. पाच ते सहा महिने झाले आहेत दुचाकी खरेदी करून. कोणतीही अडचण नाही. कंपनीकडून सर्व्हिस चांगली मिळत आहे. वाहनाचा आवाज येत नाही. सुरुवातीला काही प्रमाणात भीती वाटत होती. परंतु आता नाही. पुणे, लोणावळ्यापर्यंत मी या गाडीवर फिरतो.

अंकुश बिसेन, चिखली, ई बाइक युजर

भविष्यात ई दुचाकींची मागणी वाढणार आहे. पेट्रोल डिझेल महागल्याने तर नक्कीच वाढेल. या वाहनांना पर्यावरण करामध्ये सवलत आहे. तसेच येत्या काही काळात नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच ई वाहनांमध्ये बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे बदल होणार आहेत. सध्या चार्जिंग स्टेशनची अडचण आहे. मात्र, ती देखील लवकरच दूर होईल.

अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पश्चिम रेल्वेवर 7 AC लोकल प्रवाशांच्या सेवेत

Team webnewswala

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे निरूत्साही

Team webnewswala

१ जून पासून ‘ब्रेक द चेन’ ची नवी नियमावली

Web News Wala

Leave a Reply