Team WebNewsWala
Other व्यापार शहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

ठाकरे सरकार कडून पुन्हा एकदा सोमवार पासून अनलॉक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नाशिकच्या गंगापूर धरण येथे 14.48 हेक्टर जागेत ग्रेपपार्क रिसॉर्ट हे पर्यटक संकुल उभारले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रविवारी, 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले

गंगापूर धरण येथे 14.48 हेक्टर जागेत ग्रेपपार्क रिसॉर्ट

तिर्थक्षेत्र असलेल्या नाशिक व परिसराला निसर्गरम्य वातावरणाचे वरदान लाभले आहे. त्याचबरोबर हा जिल्हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असल्याने वाईन कॅपिटल अशी ओळख नाशिकला मिळाली आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक शहराला भेट देत असतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरण येथे 14.48 हेक्टर जागेत ग्रेपपार्क रिसॉर्ट साकारले आहे. येथे 28 पर्यटक कक्ष, 4 ट्विन व्हिला, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या परिसरातील बोट क्लब येथे 11 बोट प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी एपूण 72 कोटी खर्च करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संकुल  ई-उद्घाटन

जागतिक पर्यटन दिनी रविवारी, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संकुल  ई-उद्घाटन. याप्रसंगी युवासेनाप्रमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

करोनाबाधित पोलिसांची संख्या१० हजारांच्या घरात

Team webnewswala

हिंदी बोलताच, A R Rehman ने उडवली अँकरची खिल्ली

Web News Wala

टाळेबंदीमुळे चित्रपट उद्योगांचे ९००० कोटींचे नुकसान

Team webnewswala

Leave a Reply