Team WebNewsWala
इतर राष्ट्रीय

कोरोनामुळे यंदा 31 December चे ड्राय सेलिब्रेशन

यंदा 31 December गुरुवारी येत आहे. शिवाय कोरोना संकट अद्याप कायम आहे. कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. याच कारणामुळे मुंबईत यंदा थर्टी फर्स्टचे ड्राय सेलिब्रेशन होणार अशी चर्चा आहे.

मुंबई : यंदा 31 December गुरुवारी येत आहे. शिवाय कोरोना संकट अद्याप कायम आहे. कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. याच कारणामुळे मुंबईत यंदा थर्टी फर्स्टचे ड्राय सेलिब्रेशन होणार अशी चर्चा आहे. दरवर्षी ३१ डिसेंबरची रात्र ही मुंबईत जल्लोषात साजरी केली जाते. मद्यप्रेमी आणि मांसाहारप्रेमींचा उत्साह तर ३१ डिसेंबरला ओसंडून वाहात असतो. पण यंदा अगदी उलट चित्र दिसण्याची शक्यता आहे. (corona may affect on thirst first celebration)

३१ डिसेंबरच्या रात्री फटाके फोडण्यास मनाई होण्याची शक्यता

थंडीच्या दिवसांत फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात, असे कारण देत ऐन दिवाळीत फटाके फोडण्यावर बंधने लागू झाली होती. आता याच कारणामुळे ३१ डिसेंबरच्या रात्रीही फटाके फोडण्यास मनाई होण्याची शक्यता आहे.

 झाडांवर वीजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यास मनाई होण्याची शक्यता

झाडांवर वीजेच्या दिव्यांची रोषणाई करणे अपघाताला आमंत्रण देऊ शकते. मागील काही दिवसांत मुंबईत वारंवार शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. तसेच वृक्ष संवर्धनाकरिता झटणाऱ्या संघटनांकडून झाडांवरील रोषणाईला विरोध होत आहे. अनेकजण झाडांवर खिळे मारुन उलटसुलट वायरचे वेटोळे घालून झाडांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा निर्माण करतात. दिव्यांच्या उजेडामुळे झाडांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. काही संघटना हा विषय घेऊन राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही वृत्त आहे. या कारणामुळे झाडांवरील रोषणाईला मनाई करणारा आदेश लागू होण्याची शक्यता आहे.

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर कठोर बंधने लादली जाण्याची शक्यता

दिवाळीच्या दिवसांत गर्दी होणे, एकमेकांना भेटणे यातून कोरोना पसरला आणि ऐन थंडीत रुग्ण कमी होण्याऐवजी काही भागांमध्ये पुन्हा वाढले. आता थर्टी फर्स्टच्या निमित्ताने हे संकट पुन्हा निर्माण होण्याचा धोका आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील अनेक क्बलमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन होत नसल्याचा तक्रारी येऊ लागल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबईत थर्टी फर्स्ट डोळ्यापुढे ठेवून कोरोना संकट वाढू नये म्हणून कठोर नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

खासगी कंपन्या चालवणार देशात Private Trains

Team webnewswala

करोना काळात तंत्रज्ञानाची मोठी मदत, 5G वर लक्ष देण्याची गरज

Team webnewswala

भारताने केला एअर बबल करार आता बिनधास्त करा विमान प्रवास

Team webnewswala

Leave a Reply