Team WebNewsWala
आरोग्य

उन्हाळ्यावर मात करण्यासाठी प्या कोकम सरबत

कोकम सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते.

उन्हाळ्यावर मात करण्यासाठी प्या कोकम सरबत

मुंबई – कोकम सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही.

कोल्ड्रिंक शरीरासाठी अत्यंत हानिकारक

मात्र, ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.

कोकम फळ हे गोवा आणि गुजरात येथे सर्वाधिक आढळते. हे एक रसदार फळ आहे जे शरीराच्या उष्णतेला थंडावा देते. या फळांची साले सुकवून टेवली जातात. कोकमाचा वापर डाळ, भाजीमध्ये प्रामुख्याने केला जातो. कोकम चिंचेप्रमाणे आंबट असते.

कोकम सरबत बनवण्याची कृती

कोकम ५ ते १०, ५० ग्रॅम साखर, काळे मीठ, जिरे पावडर, कोकम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कोकमचे पाणी चांगले एकजीव करून घ्या. यात साखर, काळे मीठ आणि जिरेपूड टाकून व्यवस्थित मिक्स करा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अनेक विकारांसाठी प्रथमोपचार सर्दी-खोकल्यावर घ्या हे घरगुती काढे

Team webnewswala

CoronaVirus News ‘या’ देशात झाला कोरोनाचा अंत

Web News Wala

Messenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना

Web News Wala

Leave a Reply