आरोग्य

नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव

नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव. उन्हाळ्यात अतिसार चा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होणं साहजिक आहे.
नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव 
नारळपाणी सेवनाने करा उन्हाळ्यातील आजारांपासुन बचाव. उन्हाळ्यात अतिसार चा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होणं साहजिक आहे. कमतरता होऊ नये या साठी आपण नारळाचे पाणी प्यावे. जेणे करून आपल्या शरीरात पोषक तत्वाची कमतरता होऊ नये. या मध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, अमिनो ऍसिड, एन्जाईम्स, व्हिटॅमिन सी, मुबलक प्रमाणात आढळतात. दररोज नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या.

उलट्या

अतिसारापासून मुक्तता -शरीरात पाण्याअभावी उलट्या -अतिसार होऊ शकतो. अशा परिस्थितीत केवळ पाणी पिणे या वर काही उपाय नाही . या साठी आपण नारळ पाणी प्यावे. या मध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते. अतिसारामुळे पाणी देखील पचविणे अशक्य असते, परंतु नारळ पाण्यासह असे काही होत नाही .

डोके दुखी पासून सुटका

उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना डोके दुखी ची समस्या होऊ शकते. या मागील कारण डिहायड्रेशन देखील असू शकते. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाइट्स मिळतात या मुळे त्रासावर नियंत्रण होतो.

वजन कमी करण्यासाठी

उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात. तसेच हे पाणी प्यायल्याने पोट देखील भरलेले वाटते आणि लवकर भूक लागत नाही.

रक्त दाब नियंत्रित करण्यासाठी

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाण्याचे सेवन करावे. या मध्ये
व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम असतो जे रक्तदाब ला नियंत्रित करतो. याचे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य पातळीवर येऊ लागतो. दिवसातून दोन ते तीन वेळा हे प्यायल्याने त्वरित फायदा मिळतो.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर करण्यासाठी रोजच्या आहारात घ्या हे रस

Web News Wala

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या केंद्रावर लस

Web News Wala

मुंबईतील शाळा, महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंदच

Web News Wala

Leave a Reply