Team WebNewsWala
क्राईम शहर

ड्रीम्स मॉल आग २९ मॉलना पाच महिन्यांपूर्वीच पालिकेची नोटीस

ज्या मॉलमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा नव्हती किं वा अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन के लेले नव्हते ड्रीम्स मॉलवरही नोटीस बजावण्यात आली होती.
ड्रीम्स मॉल आग २९ मॉलना पाच महिन्यांपूर्वीच पालिकेची नोटीस

मुंबई –  मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला ऑक्टोबर महिन्यात लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेकडून मुंबईतील सर्व ७५ मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी ज्या मॉलमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा नव्हती किं वा अग्निप्रतिबंधक नियमांचे पालन के लेले नव्हते अशा २९ मॉलना नोटीस बजावण्यात आली होती. त्यात भांडुपच्या ड्रीम्स मॉल वरही नोटीस बजावण्यात आली होती.

भांडुपमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू 

मॉल्सना आपण फायर ऑडिटच्या सूचना

मुंबई सेंट्रल सिटी सेंटर मॉलला लागलेली आग नियंत्रणात येण्यास तब्बल ५६ तास लागले होते. त्या वेळी मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. सर्व मॉलमधील अग्निसुरक्षेची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिकेने दिले होते. त्यानंतर पालिके ने सर्व मॉलची तपासणी केली असता २९ मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या मॉलना अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या.

या मॉलमध्ये किती त्रुटी आहेत त्यानुसार उपाययोजना करण्यासाठी कालावधी मॉलना दिलेला होता. हा कालावधी प्रत्येक मॉलसाठी वेगवेगळा आहे. या उपाययोजना करून मॉलने अग्निशमन दलाला कळवणे अपेक्षित आहे..

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी

Web News Wala

ठाकरे सरकारकडून शिवजयंतीसाठी नियमावली जाहीर

Web News Wala

लवकरच उकाड्यापासून सुटका, पावसाच्या सरी कोसळणार

Web News Wala

Leave a Reply