Team WebNewsWala
शहर

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत घरांचे स्वप्न साकार

नववर्षांच्या सुरुवातीला मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील बीएसयूपी योजने अंतर्गत येत असलेल्या नागरिकांना घरे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

भाईंदर : नववर्षांच्या सुरुवातीला मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील बीएसयूपी योजने अंतर्गत येत असलेल्या नागरिकांना घरे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे   गेल्या दहा वर्षांंपासून संक्रमण शिबिरात राहत आलेल्या नागरिकांना देखील पालिकेला हस्तांतरित झालेल्या  गोल्डन नेस्ट येथील एमएमआरडीएच्या इमारतीत हलवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काशिमीरा येथील जनतानगर व काशी चर्च येथे केंद्र शासनाच्या बीएसयूपी योजनेंतर्गत चार हजार १३६ सदनिका  आहेत. पालिकेने आत्तापर्यंत सुमारे दोन हजार १६० लाभार्थ्यांंचेच स्थलांतर केले असून उर्वरित एक हजार ९७६ लाभार्थ्यांसाठी ही योजना पंतप्रधान मोफत गृहसंकुल योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. ही  योजना पूर्ण होण्यास सतत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने केंद्र शासनाने अखेर ही योजनाच गुंडाळली. दरम्यान या योजनेंतर्गत दोन आठ मजली इमारतींपैकी केवळ एकच इमारत अद्याप तयार होऊन त्यातील १७९ सदनिका लाभार्थ्यांंना वाटप करण्यात आल्या आहेत. उर्वरित एक हजार ९८१ लाभार्थ्यांंना सामावून घेण्यासाठी सहा १६ मजली  व एक आठ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यातील एका १६ मजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून दोन १६ मजली व एका आठ मजली इमारतीचे काम सुमारे ४० टक्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद

या चार इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद केली आहे. तर उर्वरित तीन १६ मजली इमारतींच्या पूर्णत्वासाठी पालिकेने वर्षभरापूर्वी एमएमआरडीएकडे १५० कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविला होता. तत्पूर्वी हे कर्ज पालिकेला उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर एमएमआरडीने पालिकेचे महसुली उत्पन्न पाहता तूर्तास ४० कोटींचेच कर्ज पालिकेला मंजूर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या इमारतीचे काम प्रगतीपथावर झाले असून नुकतीच बीएसयूपी  विषावर घेण्यात आलेल्या बैठकीत  महिन्याभरात घरे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.

संक्रमण शिबिरातील नागरिकांचे एमएमआरडीच्या इमारतीत स्थलांतरण

महापालिका हद्दीतील काशिमीरा येथील जनतानगर व काशी चर्च झोपडपट्टीधारकांसाठी महापालिकेने २००९ मध्ये बीएसयूपी योजना मंजूर केली होती. या भागातील झोपडय़ा तोडून विस्थापित झालेल्या ४१२ कुटुंबीयांना नवीन इमारत तयार होईपर्यंत महापालिकेने  घोडबंदर येथील संक्रमण शिबिरात पर्यायी व्यवस्था केली. मात्र वर्ष उलटले तरी या नागरिकांचे स्थलांतर रखडल्याने विविध समस्या निर्माण होऊन तक्रारी येत होत्या. त्यामुळे या नागरिकांना पालिकेला हस्तांतरित झालेल्या गोल्डन नेस्ट येथील एमएमआरडीच्या इमारतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या  बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली.

लॉटरी पद्धतीने वाटप 

बीएसयूपी योजने अंतर्गत येत असलेल्या २९४ नागरिकांना पहिल्या टप्प्यात तयार असलेल्या इमारतीत घरे देण्यात येणार आहे. घरांचे वाटप करत असताना त्यात पक्षपात होऊ नये म्हणून लॉटरी प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यानंतर खोलीचे रजिस्ट्रेशन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पालघर-सफाळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था

Team webnewswala

1 April पासून वीजदर होणार कमी

Web News Wala

MIDC चा Server hack हॅकर ची 500 कोटींची मागणी

Web News Wala

Leave a Reply