Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान व्यापार शहर

Door Step Banking आता घरपोच मिळणार बँकेच्या सेवा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची Door Step Banking आता घरपोच मिळणार बँकेच्या सेवा (घरपोच बँकिंग सेवा) लाँच केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची Door Step Banking आता घरपोच मिळणार बँकेच्या सेवा (घरपोच बँकिंग सेवा) लाँच केली आहे. यामुळे सार्वजनिक बँकांच्या ग्राहकांना खासकरून वृद्ध आणि दिव्यांग लोकांना याचा मोठा फायदा होईल.

घरपोच बँकिंग सेवेचा उद्देश ग्राहकांना बँकिंग सेवा या कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सहज उपलब्ध होतील हा आहे. ग्राहक याद्वारे आपल्या सेवची विनंती देखील ट्रॅक करू शकतात.

ही सेवा देशभरातील निवडक 100 सेंटर्सद्वारे नियुक्त एजेंटद्वारे लोकापर्यंत

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माहिती दिली की, ही सेवा देशभरातील निवडक 100 सेंटर्सद्वारे नियुक्त एजेंटद्वारे लोकापर्यंत पोहचवली जाईल. सध्या विना-वित्तीय सेवा जसे की चेक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर्स इत्यादी उपलब्ध आहेत. ऑक्टोंबरपासून वित्तीय सेवा देखील ग्राहकांना मिळतील. यासेवेसाठी ग्राहकांकडून काही शुल्क देखील आकारले जाईल.

Door Step Banking  ही सेवा लाँच करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, बँका या अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्यासाठी उत्प्रेरकच्या भूमिकेत आहेत. बँकांचे मूळ कार्य काय आहे ते विसरू नये. जे कर्ज देणे आणि त्यातून पैसा निर्माण करणे. हे कायदेशीर कार्य आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा

Team webnewswala

लोकल प्रवासासाठी खोटे QR Code बनवून देणारा अटकेत

Team webnewswala

अपक्ष आमदार गीता जैन यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

Team webnewswala

Leave a Reply