Team WebNewsWala
आरोग्य पर्यावरण

कोरोना काळात गाढवाच्या दुधाला मोठी मागणी

करोना पासून बचाव व्हावा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी युरोप व अन्य देशातून गाढवाच्या दुधाला मोठी मागणी येत असल्याचे दिसून आले आहे

कोरोना काळात गाढवाच्या दुधाला मोठी मागणी

करोना मुळे एकंदरच जगात खूप बदल झाले आहेत. त्यात माणसांप्रमाणे प्राण्यांच्या आयुष्यात सुद्धा वेगाने बदल झाले आहेत. इतर वेळी दुर्लक्षित राहणाऱ्या गाढवांना सुद्धा अनन्यसाधारण महत्व या काळात मिळाले आहे. करोना पासून बचाव व्हावा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी युरोप व अन्य देशातून गाढवाच्या दुधाला मोठी मागणी येत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना काळात गाढवाच्या दुधाला मोठी मागणी

डायचे वेल रिपोर्टनुसार गाढवाच्या दुधात अनेक औषधी गुण असतात आणि ते माणसाला खुपच फायद्याचे ठरतात. या दुधाच्या सेवनाने फुफुसे मजबूत होतात, खोकला, दमा यासारखे विकार आटोक्यात येतात, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. या मुळे करोना काळात अल्बानिया सह अनेक देशात गाढवाच्या दुधाला प्रचंड मागणी आहे.

गाढवाच्या दुधाला ३ हजार रुपये दर

बीबीसीच्या बातमीनुसार संयुक्त राष्ट्राच्या खाद्य व कृषी संघटनने गाढवाचे दुध अति पौष्टिक असल्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंत या दुधाचा वापर सौंदर्य प्रसाधने आणि औषधे तयार करण्यासाठी केला जात आहे. यामुळे त्वचा मुलायम होते. या दुधात खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. हे दुध ३ हजार रुपये लिटरने विकले जाते. भारताच्या हिस्सार राष्ट्रीय अनुसंधान केंद्राने गाढव दुध डेअरी योजना आखली असून तेथे या दुधाचे तूप आणि अन्य डेअरी उत्पादने मिळणार आहेत.

गाढवाचे दुध जास्त काळ टिकत नाही. मात्र तरीही त्याचे फायदे असंख्य आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रामदेव बाबा नी मारल्या 10 सेकंदात 18 दोरीच्या उड्या

Team webnewswala

विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करणा-यांवर दखलपात्र गुन्हे

Team webnewswala

Bird Flu च्या पार्श्वभूमीवर राणीबागेतील पक्ष्यांची विशेष काळजी

Web News Wala

Leave a Reply