Team WebNewsWala
पर्यावरण शहर

डोंबिवली चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव` जनजागृतीसाठी प्रयत्न… 

डोंबिवली चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव` जनजागृतीसाठी प्रयत्न. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. २०१० सालापासून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस

डोंबिवली चिमणी प्रेमीचे `चिमणी बचाव` जनजागृतीसाठी प्रयत्न… 

डोंबिवली – सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली.या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २०१० सालापासून २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला.जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे ? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला.

पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.डोंबिवलीतील चिमणी प्रेमी शैलेश भगत हे गेली अनेक वर्ष` चिमणी बचाव`जनजागृती करत आहेत.यासाठी त्यांनी नागरिकांना आपल्या घराच्या बालकनीत कृत्रिम घरटे लावण्याची विनंती केली आहे.

याबाबत चिमणी प्रेमी शैलेश भगत म्हणाले, डोंबिवलीत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही.आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे.

२०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा

परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो. भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला.

चिमणी प्रेमी भगत हे प्रशांत रेड्डीज यांच्यासमवेत जनजागृती

चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय, हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली. डोंबिवलीत चिमण्याचे घरटे लावण्यासाठी अनेकजण माझ्याकडे चौकशी करत असतात.यावरून डोंबिवलीकर चिमणीप्रेमी आहेत हे दिसून येते. दरम्यान शनिवारी सकाळपासून चिमणी प्रेमी भगत हे त्यांचे सहकारी प्रशांत रेड्डीज यांच्यासमवेत हे जनजागृती करत होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मेट्रो-६ साठी अडथळा ठरणाऱ्या १८६ झाडांवर कुऱ्हाड ?

Team webnewswala

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

Team webnewswala

सोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Team webnewswala

Leave a Reply