Team WebNewsWala
समाजकारण

मुलुंड पूर्व येथे कर्णबधिरांना मोफत श्रवण यंत्र वाटप

महानगरपालिका हद्दीमध्ये कर्णबधिरांची संख्या लक्षणीय आहे. अनेक कर्णबधिर व्यक्तींना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार श्रवण यंत्र खरेदी करता येत नाही

मुंबई : मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये कर्णबधिरांची संख्या लक्षणीय आहे. आज अनेक कर्णबधिर मुले व व्यक्तींना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार श्रवण यंत्र खरेदी करता येत नाही. अशा कर्णबधिर व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने श्री.मा.खास. संजय दिना पाटील यांच्यामार्फत शिवसेना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय मुंबई आणि अलीयावर जंग, राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था ,मुंबई. यांच्या वतीने मुलुंड पूर्व येथे गुरुवारी 50पेक्षा जास्त कर्णबधिर व्यक्तींना श्रवण यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम मुलुंड पूर्व येथील सौ. नलिनीबाई यशवंतराव दोडे विद्यालय ,येथे 11 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिना बामा पाटील प्रतिष्ठानच्या विश्वस्त व लोकप्रिय समाजसेविका सौ.पल्लवीताई संजय पाटील आमदार रमेश कोरगावकर, एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षा आणि नगरसेविका दीपमाला बडे, यांच्या हस्ते पार पडले.

50 कर्णबधिर नागरिकांनी मोफत श्रवणयंत्र

सदर कार्यक्रमाला कु. राजोल संजय पाटील, उपविभाग प्रमुख महेंद्र वैती ,मुलुंड विधानसभा कार्यालय प्रमुख सिताराम खांडेकर, शाखाप्रमुख नीलेश मोरे, अमोल संसारे, यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमात 50 कर्णबधिर नागरिकांनी मोफत श्रवणयंत्र मशीन वैद्यकीय तपासणी करून जागीच मोफत घेतले.

महानगरपालिका हद्दीमध्ये कर्णबधिरांची संख्या लक्षणीय आहे. अनेक कर्णबधिर व्यक्तींना आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार श्रवण यंत्र खरेदी करता येत नाहीया कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी,कार्यक्रमाचे कार्यवाह श्री. अभिजीत कमलाकर चव्‍हाण, मा .वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य, यांनी खास. संजय पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले .तसेच संपूर्ण उपक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला ते श्री. डॉक्टर, आर .पी .शर्मा .विभाग प्रमुख , समाज कल्याण अधिकारी अरविंद सुरवाडे, श्री. गोपाल शर्मा यांचे सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांनी मा. वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य अभिजित कमलाकर चव्हाण यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. व कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

झाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार

Team webnewswala

माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना अडचणीत अंगणवाडी सेविकांचा कामाला नकार

Team webnewswala

लॉकडाऊनमध्ये एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला

Team webnewswala

Leave a Reply