Team WebNewsWala
Other समाजकारण

शिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप

PPE kit distribution

कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप करुन दिलेले मुंबईचे माजगाव चे उपशाखाप्रमुख श्री. समिर शिरवडकर यांना डॉक्टरांनी दिले लाख लाख धन्यवाद

रत्नागिरी जैतापुर मुंबई माजगाव शिवसेना शाखा क्रमांक 210 चे कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष उपशाखाप्रमुख समिर शिरवडकर यांनी उपलब्ध करुन दिलेल्या कोरोना प्रतिबंधक सहित्याचे आज जैतापुरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि स्थानिक डॉक्टर यांना कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
मुंबईच्या माजगाव भागातील शिवसेना शाखा क्रमांक 210 चे उपशाखाप्रमुख आणि जैतापुरचे-होळी चे सुपुत्र श्री. समिरजी शिरवडकर यांनी आपल्या भागामध्ये कोरोना महामारीच्या पाश्वभूमिवर अनेक उपक्रम राबविले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याची जोरदार चुनुक दाखवली आहे,त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संस्थानी त्यांचा गौरव केला आहे. सध्या ते राजापूर तालुका शिवसहकर सेनेचे सम्पर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

मुंबईत काम करत असताना त्यांनी आपल्या गावाकड़ेही दिले विशेष लक्ष

जैतापुर, या भागात त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या PPE KITS वाटप आज जैतापुर प्रा. आ. केंद्रातील डॉक्टरांना वाटप करण्यात आले. तसेच जैतापुरमधील स्थानिक डॉ. साजिद पावसकर आणि डॉ. शशिकान्त निकम याना PPE KITS आणी हेड शिल्ड चे वाटप करण्यात आले. हेड शिल्ड शाखाप्रमुख संदिपजी शिवलकर यांनी उपलब्ध करुण दिले होते

PPE kit distribution
या कार्यक्रमाला जैतापुरचे माजी सरपंच तथा शिवसेना राजापुर ग्राहक संरक्षक कक्ष उपतालुकाप्रमुख गिरीश करगुटकर, महिला सागवे विभागसंघटक तथा जैतापुरच्या 2 टर्म सरपंच पद भूषविलेल्या शैलजा मांजरेकर, माजी विभागप्रमुख राजा काजवे,तालुका युवा समन्वयक तथा जैतापुरचे माजी उपसरपंच प्रसाद मांजरेकर, अनसुरे उपविभाग युवाधिकारी सागर पवार,शाखाप्रमुख संदेश पाटिल, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते मनोहर पावसकर, जैतापुर ग्रा प सदस्या अनुजा दांडेकर, महिला संघटक गीता मांजरेकर, गटप्रमुख सुनील करगुटकर,सामाजिक कार्यकर्ते राकेश दांडेकर चेतन नारकर, प्रसाद करगुटकर, शशांक पावसकर,नीलेश मांजरेकर, स्वप्निल करगुटकर, दळे शाखाप्रमुख संतोष लासे, होळी शाखाप्रमुख राजू होळकर, सुनील होळकर, भावेश गुरव, जयेश गुरव,डॉ. सौ. पाध्ये, डॉ. श्री अजीत पडवळ, सुपरवाइज़ जाधव,सर्व सन्मानीय स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आरोग्य केंद्राच्या आवारात उत्तमप्रकारे बगीच्या फुलवीणाऱ्या सौ.मांडवकर आणि स्टाप चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी बाहेर असल्याने उपस्थित राहता न आल्याने जीप चे माजी सभापति अजितजी नारकर माजी उपाध्यक्ष विलासजी अवसरें, महिला उपविभाग संघटक शितल पंगेरकर, शाखाप्रमुख आनंद मांजरेकर, माजी शाखाप्रमुख महेश मांजरेकर, सुमंत मेंळेकर, बाबा पेडनेकर, गणेश मांजरेकर, परशुराम डोरलेकर, शाखा संघटक मंगल मयेकर, दीपा मांजरेकर, शिरीष पंगेरकर, आशीष पाटिल, यांनी फोन करुण शुभेच्या दिल्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

वीज कनेक्शन असणाऱ्या सर्वांसाठी लाईटबील जास्त का येते

Team webnewswala

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उभी करणार फिल्मसिटी

Team webnewswala

पडद्यामागच्या कलाकारांना मदत करणाऱ्या प्रशांत दामले, सुभाष घई यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

3 comments

Leave a Reply