Team WebNewsWala
Other अर्थकारण आंतरराष्ट्रीय नोकरी

Disney Layoff थीमपार्कमधील कमर्चाऱ्यांना लॉकडाउन चे चटके

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या डिस्ने थीम पार्कवर बेरोजगारीची अवकळा पसरली Disney Layoff थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना लॉकडाउन'चे चटके

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या डिस्ने थीम पार्कवर सध्या बेरोजगारीची अवकळा पसरली आहे. Disney Layoff थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना लॉकडाउन’चे चटके बसल्याचे दिसुन येत आहे पर्यटकांचे हसतमुखाने स्वागत करणारे डिस्ने थीमपार्कमधील कार्टून पात्रांवर निराशेचे आणि जागतिक मंदीची छटा आहे. कारण तेथील वर्षानूवर्ष काम करणाऱ्या हजारो कमर्चाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

करोनाने आर्थिक डोलारा कोलमडल्याने डिस्ने कंपनीने तब्बल २८ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडातील डिस्ने पार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना या नोकर कपातीमध्ये आपली नोकरी गमवावी लागणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार डिस्ने कंपनीने २८ हजार कमर्चारी नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. लॉकडाउनचा मनोरंजन उद्योगावर झालेला प्रचंड आघात, सोशल डिस्टंसिंगची बंधने, करोना संकट आणखी किती काळ सुरु राहील याबाबत अनिश्चितता आणि किमान मनुष्यबळात कंपनी चालवणे यासारख्या निर्बंधाने नोकर कपातीचा कटु निर्णय घ्यावा लागल्याचे डिस्ने पार्कचे अध्यक्ष जोश डी आमरो यांनी सांगितले.

करोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वच देशांत टाळेबंदी लागू करण्यात आली होती. आता जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली नाही. याउलट बेरोजगारी झपाट्याने वाढत असून कंपन्या डबघाईला आल्या आहेत.

एक तृतीयांश कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या डिस्ने थीम पार्कवर बेरोजगारीची अवकळा पसरली Disney Layoff थीमपार्कमधील हजारो कमर्चाऱ्यांना लॉकडाउन'चे चटके
डिस्ने थीम पार्क हे जगातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. अमेरिका फिरण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक डिस्ने थीम पार्कला भेट दिल्याशिवाय परतत नाही. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी थीमपार्कला भेट देतात. कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या शहरातील थीम पार्कमध्ये १,१०,००० कमर्चारी काम करत होते. मात्र या नोकर कपातीने येथील कर्मचाऱ्यांची संख्या ८२,००० पर्यंत खाली आली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये करोनाने हाहाकार उडवला होता. करोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे स्थानिक प्रश्नाने याठिकाणी टाळेबंदी घोषीत केली. ही टाळेबंदी अद्याप कायम असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता धूसर बनली आहे. त्यामुळे नजिकलच्या काळात पार्क सुरु होणे अवघड असल्याने डिस्ने कंपनी व्यवस्थपनाने नोकर कपातीचा मार्ग स्वीकारला.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

झाडाखाली शाळा घेणाऱ्या शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार

Team webnewswala

28 October 2020 दैनिक राशिभविष्य Daily Horoscope

Team webnewswala

अयोध्येनंतर पेटणार मथुरेचा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद

Team webnewswala

Leave a Reply