Team WebNewsWala
नोकरी राष्ट्रीय

EPFO ने दिली सूट, तीन दिवसात मिळेल PF ची रक्कम

पीएफओने (EPFO) त्यांचा सहा कोटींहून अधिक खातेधारकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची संधी उपलब्ध

EPFO ने दिली सूट, तीन दिवसात मिळेल PF ची रक्कम

Webnewswala Online Team – पीएफओने (EPFO) त्यांचा सहा कोटींहून अधिक खातेधारकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा अ‍ॅडव्हान्स रक्कम काढण्याची संधी उपलब्ध केली आहे. याआधी मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत (PMGKY) विशेष तरतूद केली. त्याअंतर्गत ईपीएफ सदस्य भविष्य निर्वाह निधीच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांचे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता काढून घेऊ शकतात. तुम्ही देखील याकरता अर्ज करू शकता. ईपीएफ खातेधारक यापेक्षा कमी रकमेसाठी देखील अर्ज करू शकतात. EPFO ने केलेल्या या बदलानुसार तुम्हाला ही अ‍ॅडव्हान्सची रक्कम केवळ तीन दिवसात मिळेल.

तुम्ही पीएफ खात्यातून जी रक्कम काढाल ती नॉन रिफंडेबल असेल. अर्थात जी आगाऊ रक्कम तुम्ही काढणार आहात ती परत करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जेवढी रक्कम काढाल ती रक्कम तुमच्या पीएफ खात्यातील बॅलन्समधून वजा केली जाईल. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने प्रोव्हिडंट फंड स्कीम 1952 मध्ये सुधारणा करण्यात आली होती.

दुसऱ्यांदा काढता येतील पैसे

कामगार मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, ‘कोविड -19 पँडेमिकच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ग्राहकांना आधार देण्यासाठी ईपीएफओने आता आपल्या सदस्यांना नॉन-रिफंडेबल कोविड -19 आगाऊ रक्कम (COVID-19 advance) घेण्याची परवानगी दिली आहे’. ज्या सदस्यांनी गेल्यावर्षी कोविड -19 Advance लाभ घेतला आहे ते देखील आता दुसऱ्यांदा यासाठी अर्ज करू शकतात.

केवळ तीन दिवसात मिळतील पैसे

या बदलानंतर खातेधारकांना केवळ तीन दिवसात त्यांनी क्लेम केलेली रक्कम मिळणार आहे. EPFO च्या ऑनलाइन व्यवस्थेअंतर्गत पैसे काढण्याची प्रक्रिया केवळ तीन दिवसात पूर्ण केली जाईल.

आतापर्यंत EPFO ने 76.31 लाख कोव्हिड अ‍ॅडव्हान्स दावे पूर्ण केले

ईपीएफओने 76.31 लाखाहून अधिक कोव्हिड-19 अॅडव्हान्सचे दावे निकाली काढले आहेत. ज्यायोगे आजपर्यंत एकूण 18,698.15 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ईपीएफ खातेधारकांसाठी COVID-19 advance एक चांगली आर्थिक मदत आहे, विशेषत: ज्यांचा पगार दरमहा 15000 किंवा त्यापेक्षा कमी आहे.

Web Title – EPFO ने दिली सूट, तीन दिवसात मिळेल PF ची रक्कम ( Discount given by EPFO, PF amount will be received in three days )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

गुगल पे येणार नव्या स्वरूपात

Team webnewswala

लवकरच बदलु शकतात ग्रॅच्युईटीचे नियम

Team webnewswala

अक्साई चीन चीनचा भाग, विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश

Team webnewswala

Leave a Reply