Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान

amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी

E-commerce company Amazon च्या कॅनडा (Canada) देशातील संकेतस्थळावर कर्नाटकाच्या झेंड्याची बिकिनी (bikini) विक्रीसाठी असल्याचा दावा  यूजर्सनी केल्या

amazon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी बघितलीय का

Webnewswala Online Team –  E-commerce company Amazon च्या कॅनडा (Canada) देशातील संकेतस्थळावर कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी (bikini) विक्रीसाठी असल्याचा दावा  यूजर्सनी केल्यानंतर कर्नाटकच्या कन्नड आणि संस्कृती मंत्री (Kannada and Cultural Minister) अरविंद लिंबावली (Aravind Limbavali) यांनी म्हटले आहे की सरकारकडून (government) अॅमेझॉनवर कायदेशीर कारवाई (legal action) केली जाईल. हा प्रकार कन्नड जनतेच्या स्वाभिमानाचा असल्याचे सांगत त्यांनी म्हटले आहे की सरकार अशा गोष्टी सहन करणार नाही आणि अॅमेझॉनला माफी (apology) मागण्यास सांगितले आहे. (Amazon launched such a bikini product)

amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी
amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी
गूगलच्या विरोधातही भडकला लोकांचा राग

काही दिवसांपूर्वी लोकांचा राग गूगलवरही फुटला होता, कारण गूगलने कन्नड भाषेला भारतातील सर्वात खराब भाषा म्हणून दाखवले होते. लिंबावली यांनी याबद्दलही टिप्पणी करताना म्हटले आहे, ‘आम्ही नुकताच गूगलने कन्नडच्या केलेल्या अपमानाचा सामना केला आहे. ही जखम भरते न भरते तोपर्यंत अॅमेझॉनवर कर्नाटकाच्या झेंड्याच्या रंग महिलांच्या वस्त्रांवर वापरले जात असल्याची बातमी आम्हाला कळली.’

गूगलला मागावी लागली होती माफी

लिंबावली यांनी ट्वीट केले होते, ‘बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पुन्हा पुन्हा कन्नडचा अपमान करणे बंद करावे. हा कन्नडिगांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि आम्ही पुन्हा पुन्हा अशा घटना सहन करणार नाही. अॅमेझॉन कन्नडाने कन्नडिगांची माफी मागाली. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.’ गूगलच्या प्रकरणातही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते, मात्र त्यांनी तसे केले नाही.

amzon कॅनडाच्या संकेतस्थळावरून काढले उत्पादन

हे प्रकरण म्हणजे सरकारचा अपमान असल्याचे सांगत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अॅमेझॉनविरोधात कारवाई करण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भविष्यात असे होऊ नये याकडे लक्ष देणेही गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अॅमेझॉनने कन्नडिगांची माफी मागावी अशीही मागणी केली आहे. या वादग्रस्त बिकिनीवर कर्नाटकच्या अधिकृत झेंड्याचे लाल आणि पिवळा हे रंग आहेत आणि राज्याचे प्रतीक असलेले ‘गंडभेरुंड’ आहे. पण नंतर अॅमेझॉनने हे उत्पादन काढून टाकले आहे. अॅमेझॉनकडून यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Web Title – amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची Bikini बघितलीय का ( Did you see the Kannada flag bikini brought by AMAZON )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय

Web News Wala

Google Bug Bounty 7 कोटी जिंकण्याची संधी

Web News Wala

नवीन फिचर्स आणत Telegram ची Wats app ला टक्कर

Team webnewswala

Leave a Reply