Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय इतर मनोरंजन

Despacito गाण्याने रचला इतिहास, यूट्यूबवर तब्बल ७०१ कोटी Views

Despacito हे एक जिवंत उदाहरण आहे.  हे स्पॅनिश गाणे सध्या यूट्यूबवर जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे.

संगीत हे काही ठराविक भाषेमध्येच असतं असं नाही. गाणं कोणत्याही भाषेमध्ये असो चाहते ते ऐकतातच. याच गोष्टीचं Despacito हे एक जिवंत उदाहरण आहे.  हे स्पॅनिश गाणे सध्या यूट्यूबवर जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडिओ बनला आहे. आतापर्यंत त्याला ७०१ कोटी Views मिळाले आहेत.

लुईस फोन्सी आणि डॅडी याँकी याने गायिलेलं हे ‘डेस्पासिटो’ हे गाणं सन २०१७ मध्ये रिलीज करण्यात आलं होतं. या गाण्याने अमेरिकेच्या टॉप हंड्रेड हॉट गाण्यांच्या यादीतही आपले स्थान बनवले आहे. हे स्पॅनिश भाषेतील रॅप गाणे आहे. परंतु त्याचे संगीत इतके उत्कृष्ट आणि आकर्षक आहे की जगभरातील लोकांना या गाण्यावर नाचण्यास भाग पाडले जाते.

यापूर्वी ‘गंगनम स्टाईल’ देखील अशाच प्रकारे प्रसिद्ध झाले होते

अनेक जण हे या गाण्यासह स्टेप्स करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत आहे. आपल्याला लक्षात असेल की, यापूर्वी दक्षिण कोरियाचे गाणे ‘गंगनम स्टाईल’ देखील अशाच प्रकारे प्रसिद्ध झाले होते.

लुईस फोन्सी आणि डॅडी यांकी हे दोघेही अमेरिकेतील पॉर्ट रिकोमधील गायक आणि संगीतकार आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. 

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

टाटा सन्स खरेदी करणार Air Asia चे ३२.६७ टक्के शेअर्स

Web News Wala

कोरोनामुळे यंदा 31 December चे ड्राय सेलिब्रेशन

Web News Wala

फ्लाइट टू नोव्हेअर विमानाची तिकटं १० मिनिटांमध्ये संपली

Team webnewswala

Leave a Reply