Team WebNewsWala
शहर समाजकारण

आयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी

आयलॉग पोर्ट ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी

Webnewswala Online Team – राजापूर तालुक्यातील नाटे मध्ये येऊ घातलेले मे आयलॉग पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नाटे आणि परिसरात प्रकल्पसाठी ६५० ते ७०० हेक्टर ,त्यापेक्षा जास्त जमीन २००४ -२००५ मध्ये येथील शेतकऱ्यांकडून संपादीत केली आहे.परंतु आजतागायत संपादित केलेल्या जागेवर कोणतंही प्रकल्पाचे काम सुरू नाही, मग सदर जमीन घेऊन कंपनी ने काय साध्य केले आहे.असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शासनाच्या अधिनियानुसार सदर जमीन वर पाच वर्षांत कोणतेही काम सुरू नसल्याने त्या जनीम शेतकरयांना परत करावे, अशी मागणी समिर शिरवाडकर करीत आहेत.

तहसीलदार राजापूर कडे चौकशी आणि पुढील कार्यवाही साठी

महसूल विभागाने दिला अहवाल आजतागायत सदर जमिनीवर कोणतेही बांधकाम अस्तित्वात नाही. सदर, विषयावर माननीय जिल्हाधिकारी – रत्नागिरी यांना शिरवाडकर यांनी दि.२७-०२-२० रोजी पत्रव्यवहार करून त्या मध्ये महसूल व वन विभाग खात्याच्या अधिसूचना क्र. एलक्युएन-१२/२०१३/प्रं. क्र.१९०/अ-२ नुसार राजापूर तालुक्यातील प्रस्तावित मे. आयलॉग पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ने संपादित केलेली जमीन परत करणेची मागणी केली आहे.
शासना च्या वरील अधिसूचनेनुसार भूसंपादन पुनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ ( २०१३ च्या ३० ) प्रमाने भूमीसंपादन पुनर्वसन व पुनर्वसहात प्राधिकरन क्र २३ मूळ जमिनी मालकाला परत करणे या अधिनियमांतर्गत कोणतीही जमीन ताब्यात घेण्यात आलेल्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी न वापरता तशीच पडून राहिली तर ज्या संस्था करीता ती जमीन संपादीत करण्यात आली होती, त्या संस्थेला नोटिस बजावून राज्य शासनाने याबाबत चे लेखी आदेश संमत करून ती जमीन मूळ मालकाला परत केली जाईल, किव्हा राज्य शासन आपल्या स्वाधीन करेल.

सदर, पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने याची चौकशी आणि कार्यवाहीसाठी पत्र क्र. भुस/समनवय/कार्य-१/कावी ५५०/२०२० दि.११/०३/२०२० उपविभागीय अधिकारी राजापूर यंच्याकडे वर्ग केला आहे. अजूनही कोणतेही या पत्रावर कार्यवाही झाली नाही,आणि म्हणूंन शिरवाडकर यांनी त्या पत्रावर माहिती अधिकार दाखल १७-०२/२१ ला केला.त्याच उत्तर जिल्हाधिकारी कार्यलाय भूसंपादन शाखा ने आपल्या पत्र क्र. भुस/समन्वय/कार्या-१/मा.अ/एसआर ०४/२०११ दि.२२/०२/२१ रोजी पुढील कार्यवाही साठी पुन्हा विभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे वर्ग केला.या वर उपविभागीय अधिकारी यांनी पुढील चौकशी साठी मा. तहसीलदार यांच्याकडे पत्र.क्र. कावी-१२९३/२०२१ दि.१६/०३/२१ नुसार प्रकल्प मे.आयलॉग च्या संपादित जमिनी च्या बाबतीत मा. तहसिल राजापूर यांच्याकडे चौकशी साठी आहे.

मे आयलॉग पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड नाटे ने संपादित केलेली जमीन शेतकऱ्यांना परत करावी.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र सचिव – श्री समिर विजय शिरवडकर यांची मागणी

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात अडचणी

Team webnewswala

मोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत

Team webnewswala

1 April पासून वीजदर होणार कमी

Web News Wala

Leave a Reply