Team WebNewsWala
राष्ट्रीय

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

'Central Vista' प्रकल्पाला प्रकल्पाला स्थगिती नाही. प्रकल्पाविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांवरच कारवाई करत १ लाख रुपयाचा दंड ठोठावला

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार 

Webnewswala Online Team – दिल्ली उच्च न्यायालयाने सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प विरोधात करण्यात आलेली याचिका फेटाळली असून देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच सुरु असलेले सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे सर्व प्रकारचे बांधकाम रोखण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

दरम्यान ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असून १ लाखांचा दंडही याचिकाकर्त्यांना ठोठावला आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने ही जनहित याचिका नसून प्रवृत्त होऊन करण्यात आलेली याचिका असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्प स्थगित करण्याची मागणी फेटाळली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाने अन्या मल्होत्रा आणि सोहेल हाशमी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान १७ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. याचिकेमध्ये कोरोना संकटात हा प्रकल्प महत्वाचा नसून त्याचे काम रोखले जाऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला होता. पण दिल्ली उच्च न्यायालयाने प्रकल्पाचे काम रोखण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने बांधकामाच्या ठिकाणीच कामगार राहत असल्याने बांधकाम थांबवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन होत नसल्याचेही उच्च न्यायालयाने सांगितले आहे. सेंट्रल व्हिस्टा एक महत्त्वपूर्ण, अत्यावश्यक राष्ट्रीय प्रकल्प असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title – सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प बांधकाम रोखण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार ( Delhi High Court refuses to stop construction of Central Vista project )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

उज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना

Web News Wala

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले, इमारतींना तडे

Web News Wala

दुसरी लाट आटोक्यात दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा कमी

Web News Wala

Leave a Reply