Team WebNewsWala
शहर

1 April पासून वीजदर होणार कमी

राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने 1 April पासून वीजदर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 April पासून वीजदर कमी करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने 1 April पासून वीजदर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण सामान्य नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. मार्च २०२० मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले.

कोणतीही नवी ऑर्डर नाही

विजेचे दर २ टक्के कमी झाले आहेत का? हे तपासण्याची गरज आहे. गेल्या वर्षी ७ टक्क्यांनी विजेचे दर कमी झाले; असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र विजेचे दर ७ टक्के वाढले होते. गेल्या वर्षी पंचवार्षिक ऑर्डर झाली आहे. आता कोणतीही नवी ऑर्डर झालेली नाही. बहुवार्षिक ऑर्डरमध्ये २० आणि २१ यांची तुलना करावी लागेल. तुलना केल्यानंतर वाढ झाली की घट झाली, हे समजेल. आतासुद्धा एका विभागात कुठे तरी कमी झाले असतील. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले आहेत का? ते तपासावे लागेल. सगळ्या विभागात विजेचे दर कमी झाले असतील; असे म्हणता येत नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत ठोस निर्णय घ्यायला हवा.
– प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

मुंबईकरांना असा मिळेल लाभ

या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

ऐन गरमीच्या दिवसात ठाणे रेल्वे स्थानक झाले गारेगार

Web News Wala

नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

Team webnewswala

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत

Web News Wala

Leave a Reply