Other पर्यावरण

कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू

Death of Nandini tigress at Katraj Zoo

पुणे – पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ‘नंदिनी’ या वाघिणीचा आज (गुरुवारी) सकाळी अल्पशा आजारपणानंतर मृत्यू झाला.

पुण्यातील पेशवे पार्कमध्ये 16 वर्षांपूर्वी जन्मलेल्या तीन बछड्यांपैकी ही एक वाघीण होती. त्यानंतर ती राजीव गांधी प्राणी संग्रहालयात होती. मागील 15 दिवसांपासून ती आजारी होती. त्यामुळे तिला सलाईनवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी अखेर तिची प्राणज्योत मालवली.

प्राणी संग्रहालय प्रशासनाने तिला वाचविण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याला यश आले नाही. अखेर नंदिनीने जगाचा निरोप घेतला.

Death of Nandini tigress at Katraj Zoo

पुण्याच्या पेशवे पार्कमध्ये 16 वर्षांपूर्वी पेशवे पार्कमध्ये तीन बछडे जन्मले होते. त्यात दोन मादी आणि एक नर होते. नंदिनी, दामिनी आणि तान्हाजी असे त्यांचे  नामकरण करण्यात आले होते.

नंदिनी आणि तान्हाजी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात होते तर दामिनीला राजस्थानच्या एका प्राणी संग्रहालयाला देण्यात आले होते. तिचाही मागील वर्षी मुत्यू झाला.

Death of Nandini tigress at Katraj Zoo

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील तिन्ही बछडे पर्यटकांचे मोठे आकर्षण होते. त्यांना पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात मोठी गर्दी व्हायची.

दरम्यान मागील 15 दिवसांपासून नंदिनीने खाणेपिणे सोडले होते. त्यामुळे तिला सलाईनवर ठेवले होते. आज सकाळी अखेर तिचे प्राणोत्क्रमण झाले.

हे ही वाचा 
मृत अजगराचे फोटो व्हायरल करणे पडले महागात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल 
पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन सज्ज
रितेश विकतोय ‘शाकाहारी मटण’ …. काय आहे हे नवीन प्रकरण 

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी Reliance Foundation ची USAID सोबत भागिदारी

Team webnewswala

कोरोनामुळे गुलाबाचे गांडुळ खत बनविण्याची परिस्थिती

Team webnewswala

तब्बल 1600 भारतीय कंपन्या chinese money trap च्या विळख्यात

Team webnewswala