Team WebNewsWala
ऑटो क्राईम

Dancing Car Scorpio Viral, पोलिसांनी केली कारवाई

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी एक ‘मॉडिफाय’ केलेली Dancing Car Scorpio कार ताब्यात घेतली आहे. यासोबतच कारच्या मालकाला 41 हजार 500 रुपये दंड

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी एक ‘मॉडिफाय’ केलेली Dancing Car Scorpio कार ताब्यात घेतली आहे. यासोबतच कारच्या मालकाला 41 हजार 500 रुपये दंडही आकारण्यात आला. या कारवर जातिवाचक उल्लेखही होता. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी Dancing Car Scorpio चा व्हिडिओ शेअर केला आहे.

मॉडिफाय केलेली Dancing Car पोलिसांनी घेतली ताब्यात

रविवारी उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद पोलिसांकडे काही उपद्रवी तरुण रस्त्यावर कर्कश्य आवाजात गाणी वाजवत असून स्टंट देखील करत असल्याची तक्रार आली होती. नसूम अहमद (Nasum Ahmed) असं गाडीच्या मालकाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने आपली स्कॉर्पिओ कस्टमाइज केली होती. आतून-बाहेरुन त्याने गाडी सजवली होती, तसेच मोठमोठे स्पीकरही लावले होते. चालकाने ब्रेक मारल्यानंतर ही कार जोरजोरात हलायची, त्यामुळे बघणाऱ्याला ती डान्सिंग कारप्रमाणे वाटायची.

भविष्यात कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट मॉडिफाय केल्यास कठोर कारवाई केली जाईल

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असून भविष्यात कोणी कार, ट्रॅक्टर किंवा बुलेट मॉडिफाय केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबईकरानो मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करा साफसफाई

Team webnewswala

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Storm R3 ची बुकिंग सुरू

Web News Wala

बाबा का ढाबा परत एकदा चर्चेत

Team webnewswala

Leave a Reply