Team WebNewsWala
Other आंतरराष्ट्रीय नोकरी शिक्षण

वडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च सुंदर पिचाई

Dad's annual income is spent on travel to the United States only Says sundar pichai

गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी एका विद्यापीठाच्या व्हर्चुअल पद्वीदान समारंभाला संबोधित करताना आपल्या आयुष्यातील किस्से सांगितले. नुकतेच झालेल्या या सेरेमनीचे संभाषण आता समोर आले आहे.

ही ग्रॅजुएशन सेरेमनी युट्यूबवर “Dear Class of 2020” या शीर्षकासह लाइव्ह स्ट्रीम करण्यात आली. यामध्ये पिचाई यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच आशावादी राहण्याचा सल्ला दिला. आपल्या संघर्षाची आठवण करताना पिचाई म्हणाले, “मी 27 वर्षांचा असताना मला भारत सोडून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी जायचे होते.

या अमेरिका प्रवासात केवळ माझ्या विमानाच्या तिकीटावर वडिलांना आपल्या वर्षभराची कमाई खर्च करावी लागली होती.” विशेष म्हणजे, हा पिचाई यांच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता. महागड्या ठिकाणी जगणे कठीण होते पिचाई यांनी सांगितल्याप्रमाणे, पहिल्यांदा कॅलिफोर्नियात लँड झालो तेव्हा परिस्थिती माझ्या कल्पनेपेक्षा खूप वेगळी होती.

अमेरिका अतिशय महागडे ठिकाण होते. त्यावेळी फोन करण्यासाठी सुद्धा प्रति मिनिट दोन अमेरिकन डॉलर लागत होते. माझ्याकडे कुठलीही टेक्नोलॉजी नव्हती. मी 10 वर्षाचा होईपर्यंत आमच्या घरात एक टेलिफोन सुद्धा नव्हते. आज पाहा, प्रत्येक लहान मुलाच्या हातात सुद्धा लेटेस्ट गॅजेट किंवा स्मार्टफोन आहे.

याच तंत्रज्ञानाचा वापर करून ते विकसित होत आहेत. सुंदर पिचाई म्हणाले अस्वस्थता कधीच कमी होऊ देऊ नका. कारण, अस्वस्थतेमुळेच जगात पुढची क्रांती येईल. यातून तुम्ही जे कराल त्याची माझी जनरेशन कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

क्लायमेट चेंजच्या बाबतीत तुमचे जनरेशन आमच्या जनरेशनपासून नाराज असू शकते. परंतु, यातून बेचैन होऊ नका. तुम्ही काम करत राहा. असे केल्यास तुम्ही त्या परिस्थितीत पोहोचाल ज्याची या जगाला गरज आहे. आपला इतिहास सुद्धा आपल्याला नेहमीच आशावादी राहणे आणि कुठल्याही परिस्थितीत उमेद न सोडण्यास शिकवतो. त्यामुळे, उमेद कायम ठेवा.

चेन्नईत वाढले सुंदर पिचाई

सुंदर पिचाई तामिळनाडूच्या चेन्नई येथे वाढले आहेत. येथूनच त्यांनी आयआयटीचे शिक्षण घेतले. यानंतर ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. मग व्हॉर्टन स्कूल येथून व्यवस्थापनाचे धडे घेतले. 2004 मध्ये त्यांनी गुगलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सुंदर पिचाई ज्या व्हर्चुअल पद्वीदान समारंभात सामिल झाले त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल सुद्धा उपस्थित होते.

ऑनलाइन सहभागी झालेल्यांमध्ये सिंगर लेडी गागा आणि नोबेल विजेती मलाला युसूफझाई यांचा देखील समावेश होता.

नक्की वाचा >>
देशातील पहिली किसान रेल्वे, शेतकऱ्यांना होणार फायदा
बिग बॉस मुळे रातोरात पालटलं शहनाज गिलचं नशीब
मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

नगरसेविका रुचिता मोरे यांच्यातर्फ़े महिलांना ऑटोरिक्षा वाटप

Team webnewswala

चाकरमान्यांना ठाकरे सरकार चा मोठा दिलासा

Team webnewswala

नोकरी शोधणाऱ्यांसाठी google चे नवीन app Kormo Jobs

Team webnewswala

Leave a Reply