पर्यावरण शहर

सिंधुदुर्ग किल्ल्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा

तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला.

सिंधुदुर्ग किल्ल्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा 

Webnewswala Online Team – तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला मात्र सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. शिवप्रभूंची शिवलंका नावाजलेल्या मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्यावर तोक्ते चक्रीवादळामुळे झालेली घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले बारा दिवस विजे अभावी जीवन जगणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ले वासीयांपर्यंत आजही सिंधुदुर्गचे प्रशासन बारा दिवस उलटूनही पोहोचलेले नाहीत. तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या मागील भागावर वडाचे झाड पडून नुकसान झाले आहे.

तर किल्ल्यातील भवानी आणि महापुरुष मंदिरावरील छप्पर उडून गेले आहे. वीज खाबांची पडझड झाल्याने सिंधुदुर्ग किल्यावर अंधारात आहे. त्यामुळे तोक्ते चक्रीवादळात निसर्गाने झोडपल आणि प्रशासनाने लाथाडल अशी अवस्था झाल्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न सिंधुदुर्ग किल्लावासीयांना पडला आहे.

कोकण किनारपट्टीला तोक्ते चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर या इशाऱ्या प्रमाणे तोक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला विशेषतः मालवण व देवगड तालुक्याला जोरदार तडाखा दिला. या तडाख्यात कोट्यावधीच नुकसान झालं.

तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यात राहणाऱ्या लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाने सिंधुदुर्ग किल्यावरील सादिक शेख यांचे घराचे छप्पर उडून गेले. तर नरेश सावंत यांच्या घराच्या छपराचे पत्रे उडून गेले. श्रीकृष्ण फाटक आणि मधुसूदन फाटक यांच्या घरांच्या छपराची कौलेही उडून गेल्याने या लोकांच्या डोक्यावर आभाळाने छत पांघरले आहे.

चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्लेवासीय बनले नुकसानग्रस्त

तोक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्लेवासीय नुकसानग्रस्त बनले आहे. चक्रीवादळाने वीज पुरवठा खंडित केलाच परंतु प्रशासनाने किल्ला रहिवाशांकडे दुर्लक्ष केल्याने सध्यातरी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारच अंधार दिसत आहे. सध्या आम्ही चाळीस वर्षापुर्वीचे जीवन जगत आहोत. 1978 पर्यंत किल्ले सिंधुदुर्गवर वीज नव्हती 1979 साली किल्ल्यावर वीज पुरवठा करण्यासाठी विजेचे खांब उभारले गेले आणि 1981 मध्ये किल्ले सिंधुदुर्गवर वीज पुरवठा सुरू झाला. त्यानंतर अनेकदा वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित व्हायचा परंतु काही दिवसातच तो वीज पुरवठा सुरळीत व्हायचा आज वादळ होऊन अकरा दिवस उलटले किल्ले सिंधुदुर्ग पर्यायाने किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिर काळोखात आहे.

पावसाळ्याचे तीन महिने सिंधुदुर्ग किल्यावरील लोकांचा मालवणशी असणारा संपर्क तुटतो. पावसाळ्यात हे रहिवाशी किल्ल्यातच राहतात. त्यांना शासनाकडून तीन महिन्याचे धान्य पुरविले जाते. मात्र पावसाळा जवळ येऊनही या धान्या विषयी शासनाने कोणतीच तरतूद केलेली नाही.

Web Title – सिंधुदुर्ग किल्ल्याला तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा ( Cyclone hits Sindhudurg fort )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी

Team webnewswala

शिवसहकार सेना लढणार राजापूर अर्बन बँक निवडणूक

Team webnewswala

अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका

Team webnewswala

Leave a Reply