Team WebNewsWala
Other सिनेमा

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमा रिलीजला स्थगिती

नागराज मंजुळे च्या झुंड सिनेमा रिलीजला स्थगिती, देश-विदेश आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही बंदी. अमिताभ यांनी बच्चन फुटबॉल शिक्षकाची भूमिका साकारली

नागराज मंजुळे चा झुंड’ सिनेमा अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’ बद्दल एक निराशाजनक बातमी आहे.नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा ‘झुंड’ सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार देश-विदेश किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही. फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याचे हक्क नंदी कुमार यांनी विकत घेतले होते.

कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे उच्च न्यायालयाने आणली स्थगिती

झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित सिनेमात ही कथा दाखवण्यात आल्यामुळे कॉपीराईट हक्काचा भंग झाल्याची तक्रार नंदी कुमार यांनी दाखल केली होती. कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे सिनेमावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. ‘झुंड’च्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही नंदी कुमार यांनी केला होता.

सिनेमा करण्यास अमिताभ बच्चन यांनी दिला नकार

सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी ‘झुंड’ हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यानच अमिताभ यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती. केवळ आमिर खानच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांनी सिनेमात काम करण्यास तयार झाले होते. ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कात्रजच्या प्राणी संग्रहालयातील नंदिनी वाघिणीचा मृत्यू

Team webnewswala

इंदू की जवानी मधलं पहिलं गाणं रिलिज

Team webnewswala

आता घरबसल्या Watsapp वर ऑनलाईन करा गॅस बुकिंग

Team webnewswala

Leave a Reply