Team WebNewsWala
Other अर्थकारण धर्म मनोरंजन शहर समाजकारण

गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका

गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका असुन त्यामुळे व्यापारी अड्चणीत सापड्ले आहेत. यंदा करोनाने मात्र या बाजारपेठांचे गणित बिघडवले आहे.

ठाणे : गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका असुन त्यामुळे व्यापारी अड्चणीत सापड्ले आहेत. यंदा करोनाने मात्र या बाजारपेठांचे गणित बिघडवले आहे. नवरात्रीसाठी लागणारे कपडे, दांडिया यांसारख्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मुंबई, ठाण्यातील बाजारपेठा महिनाभर आधीच सज्ज होत असतात. गणेशोत्सवाचा काळ विक्रेत्यांसाठी मंदीचा ठरला असताना यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सवावरही बंधने येणार हे स्पष्टच आहे. याचा परिणाम बाजारपेठांवर दिसू लागला असून काळाची पावले ओळखून यंदा व्यापाऱ्यांनीही माल खरेदीपासून हात आखडता घेतला आहे.

उत्सवाच्या बाजारपेठांवर करोनाचे सावट 

नवरात्रीमध्ये लागणारे पोशाख तसेच साहित्याच्या विक्रीवर मर्यादा येणार हे लक्षात आल्याने व्यापाऱ्यांनीही हा माल पुरेशा प्रमाणात खरेदी केलेला नाही. ग्राहकच नाही तर माल भरून करणार काय, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. देवीच्या मूर्तीही कमी प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. करोनामुळे सर्वच सण-उत्सव यंदाच्या वर्षी साध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. उत्सवाच्या बाजारपेठांवर करोनाचे सावट अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. गणेशोत्सवाचा अनुभव व्यापाऱ्यांच्या गाठीशी आहेच. नवरात्रोत्सवाच्या तुलनेत घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवरात्रोत्सवात घरगुती उत्सवांचे प्रमाण फार नसते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तुलनेत नवरात्रोत्सवात मालाला आणखी कमी उठाव असेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी नवरात्रीच्या महिनाभर आधीपासून बाजारात दांडिया आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चनियाचोळी, ओढणी, जॅकेट असे विविध कपडे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. या वर्षी करोनामुळे ग्राहकांचा अल्प प्रतिसाद पाहून व्यावसायिकांनी कपडय़ाचा तसेच गरब्यासाठी लागणारा नवा माल विक्रीसाठी आणलेला नाही. बऱ्याच विक्रेत्यांनी गेल्या वर्षीचा राहिलेला जुना माल विक्रीसाठी बाहेर काढला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नवरात्रीच्या साहित्यांमध्ये कोणताही नवा ट्रेंड पाहायला मिळत नाही, असे व्यापारी आणि काही उत्साही ग्राहकांचे म्हणणे आहे. उत्सवाची धूम यंदा करोनामुळे नाहीच. त्यामुळे ग्राहक कपडे आणि दांडिया खरेदीसाठी बाजारात येत नसल्याचे ठाण्यातील विक्रेते यांनी सांगितले.

मूर्ती उत्पादनावरही परिणाम

करोनाचा फटका नवरात्र उत्सवाच्या साहित्य खरेदीबरोबर मूर्तीच्या निर्मितीलाही बसला आहे. नवरात्रोत्सवाच्या दोन ते तीन महिन्यांअगोदर देवीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली जाते. यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सवाला अवघे वीस दिवस राहिले असतानाही मूर्तिकारांमध्ये उत्सवाविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे यंदा एरवीच्या तुलनेत ५० टक्केच मूर्ती घडविण्यात आल्या आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील मूर्तिकार मनीष पोतदार यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मोदी सरकार विकणार आणखी 2 सरकारी बँका

Web News Wala

‘IDOL’ प्रवेशास १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Web News Wala

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

Leave a Reply