Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

बहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम

Corona virus हा नाक, जिभेप्रमाणे कानांवरही गंभीर दुष्परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये बहिरेपणाचं लक्षण

बहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम

Webnewswala Online Team – चव न लागणं, वास न येणं अशी कोरोनाची लक्षणं आपल्याला माहिती आहेतच. दरम्यान आता Corona virus हा नाक, जिभेप्रमाणे कानांवरही गंभीर दुष्परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये बहिरेपणाचं (Deafness) लक्षण दिसून आलं आहे. सध्या कोरोना रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसत आहेत, जी याआधी दिसली नाहीत. यामध्ये बहिरेपणा, पोटासंबंधी गंभीर आजार, रक्ताच्या गुठळ्या होऊन गँगरीन (Gangrene) होणं, यांचा समावेश आहे.

डेल्टा वेरिएंट चा 60 देशांमध्ये थैमान

कोरोनाच्या नव्या लक्षणांचा संबंध डॉक्टर कोरोनाच्या भारतातील डेल्टा वेरिएंटशी जोडत आहे. कोरोनाचा डेल्टा म्हणजे B.1.617.2 व्हेरिएंट गेल्या सहा वर्षांत 60 देशांमध्ये थैमान घालतो आहे. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हेरिएंटची संक्रमणाची तीव्रता, लशीचा प्रभाव कमी करणं अशा अनेक कारणांमुळे या स्ट्रेनचा प्रभाव गंभीर होऊ शकतो. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील अभ्यासानुसार या स्ट्रेनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका जास्त वाढतो आहे.

पोटात वेदना, उलटी, भूक कमी होणं, बहिरेपणा अशी लक्षणं नव्या कोरोना रुग्णांमध्ये पाहायला मिळत आहेत. काही रुग्णांमध्ये मायक्रो थ्रोंबी आणि रक्ताच्या गुठळ्या पाहायला मिळत आहेत. यामुळे गँगरीन होतं. ज्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या आहे, त्यांच्यामध्ये इतर लक्षणं नाहीत. याला नवा व्हेरिएंट कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. काही रुग्णांच्या तर नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, ज्या आतड्यांमधील रक्तापर्यंत पोहोचतात. ज्यामुळे रुग्णाला पोटदुखी जाणवते. दुसऱ्या लाटेतील प्रत्येक रुग्णामध्ये वेगळी लक्षणं पाहायला मिळत आहेत.

रिपोर्टनुसार चेन्नईतील अपोल रुग्णालययातील संसर्गजन्य आजारांचे डॉ. अब्दुल गफूर यांनी सांगितलं, B.1.617 चा नव्या लक्षणांशी काही संबंध आहे की नाही, हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला अधिक अभ्यासाची गरज आहे. महासाथीच्या सुरुवातीच्या लाटेच्या तुलनेत यावेळी डायरियाचे रुग्ण अधिक पाहायला मिळत आहे.

Web Title – बहिरं बनवतोय Corona Virus कानांवरही दुष्परिणाम ( Corona virus is also affecting the ears )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

BioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध

Web News Wala

ग्लोबल हब मध्ये कायमस्वरूपी रुग्णालय सुरू करा – नारायण पवार

Team webnewswala

Leave a Reply