आरोग्य राष्ट्रीय

Corona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी

आता लसींच्या उपलब्धतेबाबत एक चांगली बातमी हाती आली आहे. Corona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी.

Corona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी

Webnewswala Online Team – देशात 18 ते 44 वयोगटातील जनतेचे लसीकरण 1 मे पासून सुरू करण्यात आले. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे यामध्ये सातत्याने खंड पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच आता लसींच्या उपलब्धतेबाबत एक चांगली बातमी हाती आली आहे. Corona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी

जूनअखेर पासून महाराष्ट्राला लसीचे दररोज नऊ लाख डोस पुरवणार

केंद्र सरकारने जूनअखेर पासून महाराष्ट्राला लसीचे दररोज नऊ लाख डोस पुरवणार असल्याचं म्हटलंय. कोव्हीशील्ड, कोव्हाक्सिन या लसीचे उत्पादन वाढल्यानंतर व स्फुटनिक व्ही उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकार हा पुरवठा करेल. याबाबतची माहिती राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने महाराष्ट्राला जून महिन्यात 70 लाख तर जुलै महिन्यात एक कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात दररोज 2.13 लाख लसी देण्यात आल्या. हेच प्रमाण एप्रिल महिन्यामध्ये दररोज 3.25 लाख इतके होते.

मे महिन्यामध्ये राज्याला लसीचे 40.06 लाख डोस

केंद्र सरकारने दररोज नऊ लाख लसी देण्याची तयारी दर्शवल्यानंतर महाराष्ट्राने देखील नागरिकांना इतक्या लसी दररोज देण्याची सज्जता असल्याचं म्हटलंय. तसेच राज्यात दररोज लसीचे 15 लाख डोस दिले जाऊ शकतात असंही केंद्राला कळवलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तत्पूर्वी मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने राज्याला लसीचे 40.06 लाख डोस दिले होते. राज्याने या कालावधीत 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी 25.1 लाख अतिरिक्त लसी खरेदी केल्या. मात्र लसींचा तुटवडा भासू लागल्याने 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेल्या लसी 45 वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वापरण्यात आल्या. तर राज्यामध्ये मे महिन्यात खासगी क्षेत्राकडून 32.38 लाख लसी खरेदी करण्यात आल्या होत्या.

Web Title – Corona Virus केंद्र पुरवणार महाराष्ट्राला दररोज 15 लाख लसी ( Corona Virus Center to supply 15 lakh vaccines daily to Maharashtra )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

३८ हजार रुग्णांनी घेतला ई – संजीवनी ऑनलाईन ओपीडी चा लाभ

Web News Wala

रेल्वेत चहासाठी पुन्हा कुल्हड

Team webnewswala

PUBG Mobile India च्या लाँचिंगला सरकारची परवानगी नाही

Team webnewswala

Leave a Reply