Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू

सिंगापूरमध्ये लहान मुलांसाठी आपला कोविड -19 लसीकरण कार्यक्रम सुरू केला जात आहे. काही विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर हे लसीकरण सुरू

Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू 

Webnewswala Online Team –  सिंगापूरमध्ये मंगळवारपासून लहान मुलांसाठी आपला कोविड -19 लसीकरण कार्यक्रम सुरू केला जात आहे. काही विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर संसर्गाचे ट्रेसिंग आणि चाचण्याही करण्यास मदत व्हावी, यासाठी हे लसीकरण सुरू केले जात आहे.

प्रौढांचे लसीकरण पूर्ण होण्यापूर्वीच लहान मुलांना लस देणारे सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे. सिंगापूरमधील 39 वर्षांखालील वयोगटातील नागरिकांच्या अखेरच्या गटाचे लसीकरण पूर्ण होत असतानाच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाला तेथे सुरुवात होत आहे.

जोपर्यंत आपल्या बहुसंख्य लोकसंख्येचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत आपण संसर्ग झालेल्यांना शोधणे, वेगळे करणे आणि त्यांच्यावर उपचार करण्यास सक्षम होणार नाही. तसे झाले तरच करोनाच्या घातक विषाणूच्या साथीला आटोक्‍यात राखणे शक्‍य होईल, असे पंतप्रधान ली हिसियन लूंग यांनी सोमवारी एका भाषणात सांगितले.

लसीकरणाला पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाला सिंगापूरच्या राष्ट्रीय दिनापर्यंत, म्हणजे 9 ऑगस्टपर्यंत लसीचा किमान पहिला डोस तरी दिला जायला पाहिजे, असे नियोजन करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

सिंगापूरच्या 5.7 दशलक्ष लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना आतापर्यंत किमान पहिला डोस मिळाला आहे. सिंगापूरमधील करोना रुग्णांची संख्या कमी झाली तर दोन आठवड्यांपासून लागू असलेले निर्बंध कमी करता आला पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

सिंगापूरमध्ये गेल्या वर्षी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागली होती. त्यानंतर या महिन्यात सामाजिक एकत्रीकरणांवर पुन्हा काही निर्बंध घातले गेले आहेत. सध्याचे निर्बंध 13 जूनपर्यंत कायम राहणार आहेत. सिंगापूरमध्ये फायझर-बायोटेक आणि मॉडर्ना कंपनीची कोविड-19 विरोधी लस दिली जात आहे.

Web Title – Corona Vaccine ‘या’ देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू ( Corona Vaccine Vaccination of children aged 12-18 years in this country )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

चीन ने नुकसान भरपाई द्यावी डोनाल्ड ट्रम्प

Web News Wala

कर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे

Web News Wala

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेची काही लक्षणं

Team webnewswala

Leave a Reply