आरोग्य क्राईम राष्ट्रीय

Corona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार

सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हिशिल्ड' (Covishield) आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' (Covaxin) या दोन लसींचा वापर

Corona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार 

Webnewswala Online Team – कोविशील्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि या लसीला परवानगी देणाऱ्या आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओविरोधात लखनऊमधील एका व्यापाऱ्यानं एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आपल्या शरीरात एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार.

कोविशील्डची लस घेतल्यानंतर शरीरात एँटीबॉडीज तयार होत नाहीत. हा लोकांसोबत केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात आणि या लसीला मंजुरी देणाऱ्या संस्थांविरोधात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी प्रताप चंद्र यांनी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, जागतिक आरोग्य संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ट्रेड्रोस एधोनम, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या संचालिका अपर्णा उपाध्याय यांच्या विरोधात प्रताप चंद्र यांनी लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम गुप्ता यांनी दिली. ‘लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होतील, असं आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओनं स्पष्ट म्हटलं होतं. पण माझ्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत. सीरमनं या लसीचं उत्पादन केलं आहे. आयसीएमआर, डब्ल्यूएचओ आणि आरोग्य मंत्रालयानं या लसीला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशननं या लसीचा प्रचार केला. त्यामुळे सगळे दोषी आहेत,’ असं प्रताप चंद्र म्हणाले.

Web Title – Corona Vaccination: एँटीबॉडी तयार झाल्या नाहीत; व्यापाऱ्याकडून पोलीस तक्रार ( Corona Vaccination: No antibodies produced; Police complaint from trader )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

त्वचेवर येणारे डाग घालवण्याचे उपाय

Team webnewswala

Loan Moratorium सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा

Team webnewswala

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

Leave a Reply