आरोग्य राष्ट्रीय

Corona updates देशात 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Corona updates देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही या तीन लसींना मंजुरी देण्यात आली आहे.

Corona updates देशात 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Webnewswala Online Team – Corona updates देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही या तीन लसींना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱया डोसची एकूण संख्या 23 कोटी 13 लाख 22 हजार 417 वर पोहोचली आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार देशात दररोज 20 लाखांच्या सरासरीने कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत 36 कोटी 47 लाख 46 हजार 522 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे, तर दिवसभरात 20 लाख 36 हजार 311 जणांची चाचणी करण्यात आली. 24 तासांत देशात 1 लाख 14 हजार 460 नवे रुग्ण तर 1 लाख 89 हजार 232 जण कोरोनामुक्त झाले.

दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात

देशातील कोरोनाची दुसरी लाट आता वेगाने ओसरताना दिसत आहे. कारण रविवारी दिवसभरात देशात 1,00,636 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही निचांकी रुग्णंसख्या आहे. तर दुसरीकडे कोरोना मृतांची संख्याही घटताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात 2427 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाची साथ शिगेला असताना मृतांचा दैनंदिन आकडा हा 4500 पेक्षा जास्त होता. मात्र, आता हे प्रमाण तीन हजाराच्याखाली येणे, अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. आतापर्यंत देशातल्या तीन लाख 49 हजार 186 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातला मृत्युदर आता 1.21 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर 93.94 टक्के झाला आहे.

Web Title – Corona updates देशात 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण ( Corona updates Vaccination of 23 crore citizens completed in the country )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

 

Related posts

सूर्याचा ‘रोहिणी’ प्रवेश तापमान वाढण्याची चिन्हे

Web News Wala

दंडात्मक कारवाईनंतर मुंबई पालिकेकडून मास्क भेट

Team webnewswala

Cryptocurrency ला Infosys अध्यक्षांचा पाठिंबा

Web News Wala

Leave a Reply