नोकरी मनोरंजन

कोरोना प्रोटोकॉल पाळत राज्यात शूटिंग ला परवानगी

राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच अनुषंगाने नियमांना शिथिल करून पुन्हा शूटिंग ला परवानगी होण्याचे समजले आहे.

कोरोना प्रोटोकॉल पाळत राज्यात शूटिंग ला परवानगी

Webnewswala Online Team – कोरोनामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे,याचा फटका सिने सृष्टीला देखील बसला आहे.कोरोनामुळे चित्रपट,मालिकांचं चित्रीकरण थांबविण्यात आले होते,परंतु राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याच अनुषंगाने नियमांना शिथिल करून पुन्हा शूटिंग ला परवानगी होण्याचे समजले आहे.

या साठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत महत्वाची बैठक झाल्याचे देखील समजले आहे.राज्यसरकारने शनिवारी केलेल्या घोषणेत जाहीर केले की मुंबई आणि ठाणे मध्ये बायो बबल च्या माध्यमातून शुंटिंग करण्यात येईल.सध्या केवळ 8 तासच शुंटिंग करायला परवानगी दिली आहे.

fwici चे अध्यक्ष बी एन तिवारी म्हणाले की मुंबई आणि ठाण्यात शूटिंग ला परवानगी मिळाली आहे.आम्ही इतरवेळी 12 तास काम करतो सध्या 8 तास काम करण्याची परवानगी विषयी राज्यशासनाशी बोलणार आहो. सध्या काही निर्मिते परगावी शूटिंग करत आहे .लवकरच ते आपली शुटिंगचे काम संपवून राज्यात परततील.

सध्या तौक्ते चक्रीवादळा मुळे आमचे बरेच नुकसान झाले असून आता बायो बबलचं पालन करून शूटिंग करावी लागणार. या पूर्वी आम्ही सेटवरील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे काम पूर्ण करून घेऊ असं ही ते म्हणाले.त्यामुळे मुंबईत पुन्हा लवकरच शूटिंग सुरु होईल असे ही त्यांनी सांगितले.

Web Title – कोरोना प्रोटोकॉल पाळत राज्यात शूटिंग ला परवानगी ( Corona allowed shooting in the state following protocol)

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

PF चे नियम १ एप्रिलपासून लागू

Web News Wala

नगरसेविका रुचिता मोरे यांच्यातर्फ़े महिलांना ऑटोरिक्षा वाटप

Team webnewswala

पूनम पांडे चं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

Web News Wala

Leave a Reply