Team WebNewsWala
नोकरी समाजकारण

महावितरण कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा

महावितरण कर्मचाऱ्यांवरील कोरोना उपचार आणि विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून सदरची रजा भरपगारी देण्याचा निर्णय घेतला आहे. उपचारासाठी 50 हजार रुपयांचे आणि विलगीकरणात असणाऱयांना 25 हजार रुपये

महावितरण कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा

Webnewswala Online Team – कोरोना महामारीच्या संकटातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याची दखल घेत महावितरणने कर्मचाऱ्यांवरील कोरोना उपचार आणि विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून सदरची रजा भरपगारी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उपचारासाठी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱयांना 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. याचा हजारो वीज कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना तत्काळ बेड उपलब्ध व्हावा, उपचार मिळावेत म्हणून परिमंडळ स्तरावर समन्वय कक्ष सुरू करावा, वैद्यकीय मदतीसह आर्थिक सहाय्य करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले होते. त्यानुसार महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना काळात वैद्यकीय व आर्थिक सुरक्षा कवच देणारा निर्णय घेतला आहे.

तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱयांना सॅनिटायझर किट खरेदी करण्यासाठी एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱयांबरोबरच सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत 57 टक्के वीज कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title – महावितरण कोरोनाबाधित वीज कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा ( Compensation leave to MSEDCL coronated power employees )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

पंतप्रधान मोदींचे आवाहन या वेबसाईट ला नक्की भेट द्या

Team webnewswala

आधी लसीकरणाचं प्रमाणपत्र मगच पगार

Web News Wala

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल

Team webnewswala

Leave a Reply