Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय आरोग्य

लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता

लहान मुलांच्या लसीकरणासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान लहान मुलांच्या कोरोनाबाबत दिलासादायक अशी बातमी येते आहे.

लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता

Webnewswala Online Team – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना (Coronavirus in children) कोरोना संसर्ग झाल्याची प्रकरणं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही (Corona third wave) लहान मुलांना अधिक धोका असेल का अशी चिंता सतावते आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान लहान मुलांच्या कोरोनाबाबत दिलासादायक अशी बातमी येते आहे.

केंद्र सरकारने देशातील लहान मुलांच्या कोरोना प्रकरणांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी कोरोना संक्रमित मुलं सापडली आहेत, त्यांना एकतर दुसरा दीर्घकालीन आजार आहे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. शिवाय मुलांना तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोरोनाचा लहान मुलांना सर्वाधिक फटका बसला आहे, असा कोणताही भारतीय किंवा जागतिक डेटा नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या डेटानुसार ज्या कोरोना संक्रमित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यापैकी 60-70% मुलांना इतर दीर्घकालीन आजार आहे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे.

लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका सर्वात जास्त असेल, असा अद्याप काही पुरावा नाही. त्यामुळे भविष्यात मुलांसाठी कोरोना जास्त धोकादायक ठरू शकतो, असं मला वाटत नाही, असंही गुलेरिया यांनी सांगितलं.

Web Title -लहान मुलांबाबत दिलासादायक बातमी; संशोधनाने कमी केली चिंता ( Comforting news about children; Research has reduced anxiety )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आयपीएलच्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक

Team webnewswala

मधुमेह पासून करा बचाव या सोप्या उपायांनी

Web News Wala

करोनाबाधित पोलिसांची संख्या१० हजारांच्या घरात

Team webnewswala

Leave a Reply