Team WebNewsWala
पर्यावरण शहर

लवकरच उकाड्यापासून सुटका, पावसाच्या सरी कोसळणार

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.

लवकरच उकाड्यापासून सुटका, पावसाच्या सरी कोसळणार 

Webnewswala Online Team – अरबी समुद्रातून (Arabian Sea) येणारे बाष्प आणि राज्यावरून गेलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागात येत्या 4 ते 5 दिवसात पाऊस (Pre-monsoon) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे वेधशाळेनं (Weather Alert) तसा इशारा दिला आहे. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. पावसाच्या सरी कोसळणार.

दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून

तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून (Monsoon) पूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तसंच पुण्यातही पावसानं काल जोरदार हजेरी लावली होती. पुणे शहर आणि परिसरात संध्याकाळी हजेरी लावलेला पाऊस रात्रीपर्यंत सुरु होता. रात्री साडे आठवाजेपर्यंत शिवाजीनगर येथे 24 मिमी तर लोहगाव येथे 36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस होता.

काही भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरू

राज्यात मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत काही भागांत पूर्वमोसमी पाऊस सुरूच राहणार असल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. तर सध्या राज्यावर कमी दाबाचे दोन पट्टे निर्माण झालेत. एक पूर्व उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत, तर दुसरा पट्टा हा पूर्व मध्य प्रदेशापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत आहे. हा दुसरा कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि तेलंगणामार्गे गेला असून अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेनं बाष्पही येतंय. यामुळे राज्यात सध्या जोरदार वाऱ्यांसह पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी 2 जूनपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसंच मोसमी वारे आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होतं.

आजही जोरदार पावसाची शक्यता

2 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.

Web Title – नागरिकांची लवकरच उकाड्यापासून सुटका, पावसाच्या सरी कोसळणार( Citizens will soon be released from Ukada, rain showers will fall )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त ऑनलाइन कवी संमेलन

Team webnewswala

मालवण स्कुबा डायविंग परवानगी प्रक्रियेत MTDC ला विरोध

Team webnewswala

वीजबिल वसुली साठी महावितरण ची अनोखी शक्कल

Web News Wala

Leave a Reply