आरोग्य राष्ट्रीय

देशवासियांना करोनाची लस मिळणार मोफत; केंद्र सरकारची घोषणा

देशात हळूहळ करोना लसींना मान्यता दिली जात असताना करोनाची लस मिळणार मोफत त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं आहे

दिल्ली : नववर्षाच्या सुरूवातीलाच केंद्र सरकारनं देशवासियांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशात हळूहळ करोना लसींना मान्यता दिली जात असताना ती निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. करोनाची लस मिळणार मोफत त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलं आहे. देशभरात ड्राय रन सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.

करोनाची लस मिळणार मोफत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली.

प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे ? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मिळणार मोफत.” अशी माहिती त्यांनी दिली.

देशवासियांना केलं आवाहन

“देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं सांगत आरोग्यमंत्र्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

१ नोव्हेंबर पासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्ज होणार बदल

Team webnewswala

Income Tax संबंधित विधेयक संसदेत मंजूर

Team webnewswala

मोफत लसीकरणाची तयारी दिली 74 कोटी डोसची ऑर्डर

Web News Wala

Leave a Reply