Team WebNewsWala
सिनेमा

चिरंजीवीच्या बहुप्रतिक्षीत ‘Acharya’ चा Teaser प्रदर्शित

चिरंजीवीच्या Acharya या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे हा टीझर कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला आहे.

अभिनेता चिरंजीवीचे नाव दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांच्या यादीत आवर्जुन घेतले जाते. आज तेलुगू, तामिळ आणि कन्नड या चित्रपटांमध्ये काम केलेल्या चिरंजीवीचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग असल्यामुळे त्याच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. चिरंजीवीच्या Acharya या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे हा टीझर कमी कालावधीत तुफान व्हायरल झाला आहे.

टीझर कमी कालावधीत व्हायरल

चिरंजीवी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दमदार भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात काही साहसदृश्य चिरंजीवी करताना दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात चिरंजीवीसोबत त्यांचा मुलगा रामचरण आणि अभिनेत्री काजल अग्रवालदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. दरम्यान, कोरताल शिव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून निर्मिती रामचरण आणि निरंजन रेड्डी यांनी केली आहे. मे महिन्यात हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मराठीतला पहिला ‘झॉम-कॉम’ सिनेमा ‘झोंबिवली’

Team webnewswala

बॉलिवूडच्या अक्षयला मिळालं फोर्ब्सच्या यादीत स्थान

Team webnewswala

परिणीती च्या ‘सायना’ चं पहिलं पोस्टर रिलीज

Team webnewswala

Leave a Reply