Team WebNewsWala
Other अर्थकारण राष्ट्रीय व्यापार

चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक

चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली असून pboc ने एचडीएफसी आणि आयसीआयसीआयनंतर मध्येही गुंतवणूक केली आहे.

भारत-चीन सीमेवर तणावाचा स्थिती आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी केली जात आहे. यातच आता चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली असून पीबीओसीने एचडीएफसी आणि आयसीआयसीआय नंतर बजाज फायनान्समध्ये गुंतवणूक केली आहे.

HDFC ICICI नंतर चिनी बँकेची बजाज फायनान्स मध्ये मोठी गुंतवणूक

चीनची सेंट्रल बँक पिपल्स बँक ऑफ चाइनाने (पीबीओसी) आणखी एका कंपनीत हिस्सेदारी खरेदी केल्याची माहिती समोर आली असून, बजाज फायनान्समध्ये चीनच्या बँकेने 1 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सेदारी खरेदी केली आहे. त्यामुळे स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तज्ञांचे म्हणणे आहे की या तिन्ही कंपन्यांमध्ये चीनच्या सेंट्रल बँकेची गुंतवणूक खूपच कमी असल्याने, चिंतेचे काहीही कारण नाही.

मागील महिन्यात पीबीओसीने देशातील खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँक आयसीआयसीआयमध्ये गुंतवणूक केली होती. दोन्ही देशातील वाढत्या तणावाच्या स्थितीमध्ये ही गुंतवणूक झाल्याने यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पश्चिम रेल्वेकडून महिलांसाठी आनंदाची बातमी

Team webnewswala

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच

Team webnewswala

मराठा आंदोलन बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी

Team webnewswala

Leave a Reply