Team WebNewsWala
Other नोकरी मनोरंजन राजकारण राष्ट्रीय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उभी करणार फिल्मसिटी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फिल्मसिटी उभी करणार आहेत. नोएडातील गौतम बुद्धनगर इथं 1000 एकरमध्ये ही फिल्मसिटी उभी करणार आहेत
नोएडातील गौतम बुद्धनगर इथं 1000 एकर जागा नियोजित फिल्मसिटीसाठी राखीव असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत सांगितलं.

लखनऊ : मुंबई ही भारताची चित्रपटनगरी आहे. सर्व प्रकारचं चित्रीकरण या ठिकाणी होत असतं. मुंबईमधील गोरेगावात सर्वांत मोठी फिल्म सिटी आहे. विविध मालिका आणि चित्रपटांचं या ठिकाणी शूटिंग होत असतं. मात्र आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ फिल्मसिटी उभी करणार आहेत. नोएडामध्ये ही नवीन फिल्मसिटी उभी करण्यात येणार असून, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांशी संवाद साधला.

नोएडातील गौतम बुद्धनगर इथं 1000 एकर जागा नियोजित फिल्मसिटीसाठी राखीव असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत सांगितलं. या ठिकाणी सुसज्ज अशी फिल्मसिटी उभारण्याची योजना असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी माहिती दिली. हे ठिकाण नवी दिल्लीपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर असून नियोजित नवीन विमानतळाच्यादेखील अतिशय जवळ आहे. त्याचबरोबर महत्वाचं पर्यटनस्थळ असलेल्या आग्रा या शहरापासूनदेखील जवळ असल्यानं वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. सर्व सोयी सुविधांनीयुक्त आणि अतिशय सुसज्ज अशी फिल्मसिटी उभी करणार असल्याचं देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं.

या बैठकीला विजयेंद्र प्रसाद, राजू श्रीवास्तव, अशोक पंडित, कैलास खेर, मनोज मुंतासीर, सतीश कौशिक, मनोज जोशी, नितीन देसाई, विनोद बच्चन, प्रज्ञा कुमार, अनुप जलोटा. रवीकिशन, सौंदर्या रजनीकांत, अनुपम खेर, अतुल अग्निहोत्री, परेश रावल इत्यादी मान्यवर देखील उपस्थित होते. कोरोनाच्या संकटामुळं ही बैठक ऑनलाइन झाली.

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी कधी तयार होते हे पाहणं महत्त्वाचं

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ‘नियोजित फिल्मसिटीचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया राजू श्रीवास्तव यांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून आम्ही देखील यासाठी प्रयत्न करत असून, बॉलिवूडमधील विविध निर्मात्यांशी याबाबतीत चर्चा देखील केली होती. नवीन फिल्मसिटी तयार झाल्यामुळं स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भोजपुरी सिनेमांसाठी देखील नवीन मंच मिळणार आहे. ही फिल्मसिटी झाली तर स्थानिक अर्थचक्राला गती मिळेल आणि उत्तर प्रदेशातील प्रवासी मजुरांनाही रोजगार मिळेल. त्यामुळं आता उत्तर प्रदेशमध्ये कधी फिल्मसिटी तयार होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असंही राजू श्रीवास्तव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रेल्वेत चहासाठी पुन्हा कुल्हड

Team webnewswala

स्वातंत्र्यदिनानिमित्त टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा

Team webnewswala

नवाब मलीक यांना पडला मराठीचा विसर केले उर्दुत tweet

Team webnewswala

Leave a Reply