Team WebNewsWala
इतर तंत्रज्ञान नोकरी राष्ट्रीय शिक्षण समाजकारण

लॉकडाऊनमध्ये एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला

आपल्या आधार पत्रकामध्ये चुकीचा पत्ता असल्यास त्यामध्ये बदल करणे. होय आपणं घरी बसून देखील लॉकडाऊनमध्ये केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला
कोरोनाच्या संक्रमणकाळात लॉकडाऊन असल्यामुळे सगळे घरामध्ये बसले आहेत. आज आपली सर्व महत्त्वाची कामे अडकलीत आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचे काम आहे आपल्या आधार पत्रकामध्ये चुकीचा पत्ता असल्यास त्यामध्ये बदल करणे. होय आपणं घरी बसून देखील लॉकडाऊनमध्ये केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला

केवळ एका फोटोने आधार कार्डचा पत्ता बदला

सर्वात आधी https://uidai.gov.in/ वेबसाइटला भेट द्या आणि त्यामध्ये ‘Online Address Update‘ वर क्लिक करावं. आपला पत्ता टाकावा आणि सहाय्यक दस्तऐवजाची कलर स्कॅन फाइल अपलोड करावं.

या प्रक्रियेचे करा अनुसरण

आपल्याला आपला ऑनलाईन पत्ता बदलण्यासाठी या https://uidai.gov.in/ संकेत स्थळावर जावे लागणार. त्या नंतर आपल्याला My Adhaar या टॅब वर क्लिक करावे लागेल.

आता आपल्याला ड्रॉपडाऊनच्या दुसऱ्या टॅब वर Update Your Aadhaar मध्ये जावे लागणार. येथे आपल्याला अजून एक तिसऱ्या ऑप्शनला Update Your Address Online ला क्लिक करावे.

या नंतर एक नवे पान आपल्या समोर येईल. या पानावर खालील बाजूला Proceed to Update Address वर क्लिक करा. या नंतर आपल्याला आपले आधार नंबर, captcha व्हेरिफिकेशन द्यावे लागतील. असे केल्याने आपल्याकडे ओटीपी नंबर येईल. हा ओटीपी नंबर देऊन लॉगिन वर जाऊन क्लिक करा.

नवीन पत्त्याची माहिती द्यावी लागणार
या नंतर आपल्याला इथे Update Address Via Address Proof चे विकल्प मिळेल. या विकल्पाची निवड केल्यावर एका नवीन पानावर आपल्याला आपला नवीन पत्त्याची माहिती द्यावी लागणार.
ह्याचबरोबर आपल्याला काही महत्त्वाचे दस्तऐवजसुद्धा जमा करावे लागणार. आपल्या ऑनलाईन व्हेरिफिकेशन नंतर आपल्या आधार कार्डामधील पत्ता बदलविण्यात येईल. तसेच आपले नवीन आधार कार्ड आपल्या नव्या पत्त्यावर पोस्टाने पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी आपण UIDAI च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रिझर्व्ह बँकेचा QR Code साठी नवा नियम

Team webnewswala

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार Tik Tok ?

Team webnewswala

WhatsApp New Feature : Multiple Device Login होणार सुरू

Web News Wala

Leave a Reply