Team WebNewsWala
ऑटो

Zeeho Cyber ई-स्कूटर भारतीय बाजारात लाँच

CFMoto ने त्यांची सब-ब्रँड Zeeho लाँच केली होती, कंपनीने अलीकडेच त्यांची बाईक Zeeho Cyber ई-स्कूटर भारतीय बाजारात

Zeeho Cyber ई-स्कूटर भारतीय बाजारात लाँच

बीजिंग – चीनची आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सीएफमोटोने (CFMoto) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांची सब-ब्रँड झीहो (Zeeho) लाँच केली होती, जी इलेक्ट्रिक दुचाकी तयार करते. यानंतर कंपनीने अलीकडेच त्यांची बाईक 300NK ची नवीन बीएस 6 आवृत्ती भारतीय बाजारात लाँच केली आहे. त्यानंतर आता कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. (CFMoto is going to launch Zeeho Cyber Electric Scooter in india, will give 130KM range in single charge)

CFMoto च्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची कॉन्सेप्ट नुकतीच सादर करण्यात आली होती. ZigWheels च्या अहवालानुसार कंपनी लवकरच झीहो सायबर इलेक्ट्रिक स्कूटरचे (Zeeho Cyber Electric Scooter) प्रॉडक्शन मॉडेल बाजारात आणणार आहे.

Zeeho Cyber ई-स्कूटरचं डिझाईन

या स्कूटरच्या कॉन्सेप्ट डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास ते फ्युचरिस्टिक डिझाइनवर आधारित आहे, पण त्याचे प्रॉडक्शन मॉडेल त्यापेक्षा वेगळे असेल. कॉन्सेप्ट फॉडलमध्ये स्कुटरच्या फ्रंटला LED हेडलॅम्प देण्यात आले आहेत, जे टू-विंग लाइट पॅनेलसह सुसज्ज आहे. त्याचा पुढचा भाग मस्क्युलर आणि स्पोर्टी दिसतो, जो रियर एंडपेक्षा लहान आहे. या स्कूटरची सीट थोडी लहान आहे, परंतु दोन व्यक्तींना बासण्यासाठी पुरेशी आहे.

Zeeho Cyber ई-स्कूटरचे स्पेसिफिकेशन

या स्कूटरमध्ये 4kWh ची लिथियम आयन बॅटरी आहे आणि 10 किलोवॅट वॉटर-कूल्ड मोटर आहे जी 13.4 बीएचपी पॉवर आणि 213 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. वेगाच्या दृष्टीने हे बेस्ट आहे. ही स्कूटर केवळ 2.9 सेकंदात 0 ते 50 Kmph इतका वेग पकडू शकते. ही स्कूटर जास्तीत जास्त 110 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 130 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

Zeeho Cyber ई-स्कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड

यामध्ये तुम्हाला Eco, Street Sport असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्कूटरची बॅटरी 3 लाख किलोमीटरपर्यंत आहे. अवघ्या 30 मिनिटांत यामधील बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ही बॅटरी अशा प्रकारे तयार केली गेली आहे की -20 अंश ते 55 अंश तापमानातही ती उत्तम प्रकारे काम करते. जवळजवळ सर्वच देशांमधील हवामानानुसार ही बॅटरी उत्तमप्रकारे काम करते, तशाच पद्धतीने ही बॅटरी डिझाईन करण्यात आली आहे.

वर्षअखेरपर्यंत लाँच होणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतात सादर होणारं मॉडेल यापेक्षा थोडं वेगळं असेल आणि कंपनी लवकरच त्याबद्दल माहिती शेअर करेल. असं म्हटलं जातंय की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करू शकते. मात्र जागतिक बाजारात त्याआधीच (जूनमध्ये) लाँच केली जाईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात

Web News Wala

Ola भारतात लाँच करणार Ola Electric Scooters

Team webnewswala

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर

Team webnewswala

Leave a Reply