Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय क्रीडा

कर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत लिओनेल मेस्सी ला मागे टाकत कर्णधार सुनील छेत्री दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.

कर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे

Webnewswala Online Team – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री ने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलर लिओनेल मेस्सी ला मागे टाकत कर्णधार सुनील छेत्री दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. फिफा वर्ल्ड कप 2022 आणि आशियाई चषक 2022 च्या संयुक्त क्वालिफायर स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दोन गोल करून छेत्रीने हे यश संपादन केले. पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री च्या दोन गोलच्या मदतीने ग्रुप-ईच्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. या विजयामुळे भारतीय संघाच्या आशियाई क्वालिफायरच्या तिसऱ्या फेरीसाठी थेट पात्रतेच्या आशा वाढल्या आहेत. फिफा विश्वचषक पात्रता संघातील सहा वर्षांत हा संघाचा पहिला विजय आहे.

मेस्सीला टाकले मागे

सामन्याच्या उत्तरार्धात 36 वर्षीय सुनील छेत्रीने हे दोन्ही गोल केले. पहिल्या गेमच्या 79व्या मिनिटाला त्याने गोल करत संघाचे खाते उघडले. यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याच्या गोलांची संख्या वाढून 73 झाली आणि त्याने मेस्सीला (72 गोल) मागे टाकले आहे. खेळाच्या शेवटच्या क्षणी अतिरिक्त वेळेत दुसरा गोल केल्याने संघाचा विजय निश्चित झाला.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सक्रिय खेळाडूंमध्ये आता पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (103 गोल) नंतर सर्वाधिक गोल छेत्रीच्या (74 गोल) नावावर आहेत.

या कामगिरीबद्दल ऑल इंडिया फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनील छेत्री यांचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, “आमच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्या नावावर अजून एक कामगिरी नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक सक्रिय खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांनी अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेलला मेस्सीला मागे टाकले आहे. या कर्तृत्वाबद्दल त्यांचे अभिनंदन. भविष्यात अशा आणखी विक्रमासाठी आमच्या शुभेच्छा. ”

अव्वल दहापासून एक गोल दूर

आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या अव्वल १० खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी छेत्रीला केवळ आणखी एका गोलची आवश्यकता आहे. हंगेरीचा सँडोर कॉक्सीस, जपानचा कुनिशिगे कामामोटो आणि कुवेतचा बशर अब्दुलाह हे माजी खेळाडू संयुक्तरित्या दहाव्या स्थानावर असून त्यांच्या नावे प्रत्येकी ७५ गोल आहेत.

Web Title – कर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे ( Captain Sunil Chhetri’s record surpasses that of Lionel Messi )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

WTC 2021 इंग्लंडमध्ये Team India चा लाजीरवाणा रेकॉर्ड 0 रनमध्ये 4 विकेट्स

Web News Wala

Pro Kabaddi League चा आठवा हंगाम लांबणीवर

Team webnewswala

भारतीयांसाठी आनंदाची बातमी, H-1B व्हिसा नियमांमध्ये बदल

Team webnewswala

1 comment

कर्णधा&#235... June 9, 2021 at 8:11 pm

[…] आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत लिओनेल मेस्सी ला मागे टाकत कर्णधार सुनील छेत्री दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.  […]

Reply

Leave a Reply