Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय

‘Brexit’ इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर

इंग्लंड आणि युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या करारानुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजता Brexit पूर्ण झाले. इंग्लंड युरोपियन युनियनमधून बाहेर
लंडन: इंग्लंड (ब्रिटन) आणि युरोपियन युनियन (युरोपियन महासंघ) यांच्यात झालेल्या करारानुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजता Brexit पूर्ण झाले. इंग्लंड हा देश युरोपियन युनियनमधून बाहेर पडला. ‘एक चलन, एक पासपोर्ट, एक व्हिसा‘ असे धोरण राबवण्यासाठी युरोपियन युनियनची स्थापना झाली. इंग्लंडने या युनियनमध्ये प्रवेश केल्यामुळे युरोपियन युनियनचे महत्त्व वाढले. पण आता इंग्लंड हा देश युरोपियन युनियनमधून बाहेर पडला आहे. यामुळे युरोपियन युनियन भविष्यात किती प्रभावी राहणार आणि ब्रेक्झिटमुळे इंग्लंडच्या अर्थकारणावर काय परिणाम होणार यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
इंग्लंड युरोपियन युनियनमधून ३१ जानेवारी रोजी बाहेर पडणार

कायदेशीदृष्ट्या इंग्लंड युरोपियन युनियनमधून ३१ जानेवारी रोजी बाहेर पडणार आहे. पण ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री ११ वाजल्यापासून ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंतचा कालावधी Brexit नंतर कायदेशीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी नव्याने करायच्या तरतुदींसाठी वापरला जाणार आहे. या कालावधीत युरोपिनय युनियन आणि इंग्लंडचे सरकार आपापल्या कायद्यांमध्ये नव्याने काही तरतुदी करतील. आता युरोपियन युनियनचे कायदे इंग्लंडला लागू नसतील.

व्यापाराला चालना देण्यासाठी युरोपियन युनियनची स्थापना

व्यापाराला चालना देण्यासाठी युरोपियन युनियनची स्थापना झाली. पण युनियनने एक चलन हे धोरण स्वीकारल्यानंतर युरोपमधील काही देशांससमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थितीत असलेल्या इंग्लंडचेही काही प्रमाणात नुकसान झाले. यानंतर इंग्लंडमध्ये युनियनमधून बाहेर पडण्याची मागणी जोर धरू लागली. बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये नवे सरकार स्थापन झाले. या सरकारने अनेक अडचणींवर मात करुन युरोपियन युनियन सोबत ब्रेक्झिट अंमलात आणण्यासाठी करार केला. या करारानुसार ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजता Brexit पूर्ण झाले.

ब्रेक्झिटमुळे इंग्लंडला कोणत्याही देशासोबत व्यापार करार करण्याचे स्वातंत्र्य  

Brexit पूर्ण झाल्यावर इंग्लंडमधून युरोपियन युनियनमध्ये तसेच युरोपियन युनियनमधून इंग्लंडमध्ये येणाऱ्या कोणत्याही मालावर जकात लागू होणार नाही. इंग्लंडमधून युरोपियन युनियनमध्ये तसेच युरोपियन युनियनमधून इंग्लंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना स्वतंत्र व्हिसा घ्यावा लागणार नाही. इंग्लंड आणि युरोपियन युनियन यांच्यातील रोमिंग शुल्क कमीत कमी ठेवले जाईल. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडला कोणत्याही देशासोबत व्यापार करार करण्याचे स्वातंत्र्य मिळेल तसेच इंग्लंडच्या सागरी सीमेवर इंग्लंडचाच हक्क आणि अधिकार राहणार आहे.

इंग्लंड तसेच युरोपमधील अन्य देशांमधून भारताची प्रामुख्याने वाहन निर्मिती, माहिती-तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि स्टील या उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक आहे. युरोपियन युनियन आणि इंग्लंड यांच्यातील माल वाहतूक जकातमुक्त असल्यामुळे भारताचे ब्रेक्झिटमुळे नुकसान होणार नाही असे सध्या दिसत आहे. कराराची कलमे सविस्तर स्वरुपात इंग्लंडच्या संसदेसमोर येतील त्यावेळी भारताच्या फायद्यातोट्याचे नेमके स्वरुप स्पष्ट होणार आहे.

यापूर्वी टाटा सन्सच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून एअर एशिया इंडियाच्या ४९% मालकीची असलेल्या या विमान कंपनीने म्हटले आहे की, या विक्रीमुळे कंपनीला त्यांच्या इतर आशियाई बाजारपेठेतील व्यवसाय पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रीत करता येईल.

Air Asia चे इतर आशियाई बाजारपेठेतील व्यवसाय पुनर्प्राप्तीवर लक्ष

या व्यवहारामुळे अल्पावधीत कंपनीच्या रोखीची घट कमी होईल आणि एअर एशियाला मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समधील दीर्घ काळापासून त्याच्या आशियाईमधील प्रमुख बाजाराच्या पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल असंही कंपनीने म्हटलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एअर एशियाने अशाच प्रकारे जपानमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अमेरिका भारतातील FDI चा दुसर्‍या क्रमांकाचा स्रोत

Web News Wala

Cricket ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांत 18 आंतरराष्ट्रीय सामने

Web News Wala

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉक चा व्यवसाय

Team webnewswala

Leave a Reply