Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान समाजकारण

BioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध

इस्रायलच्या BioMilk नावाच्या Startup ने महिलांच्या स्तनपेशी पासून प्रयोगशाळेत आईचे दूध बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. आईच्या दुधात असणारी सर्व पोषक द्रव्ये या दुधात आहेत

BioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध

Webnewswala Online Team – इस्रायलच्या BioMilk नावाच्या Startup ने महिलांच्या स्तनपेशी पासून प्रयोगशाळेत आईचे दूध बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. आईच्या दुधात असणारी सर्व पोषक द्रव्ये या दुधात आहेत फक्त त्यात अँटीबॉडी नाहीत असे BioMilk स्टार्टअपच्या सहसंस्थापक व चीफ सायन्स ऑफिसर लिल स्ट्रिकलँड यांनी सांगितले.

विशेष म्हणजे असे आईचे दूध तयार करण्याची प्रेरणा लील यांना स्वतःच्या अनुभवावरून मिळाली. लील यांच्या मुलाचा जन्म अपुऱ्या दिवसांचा झाला होता आणि त्यामुळे त्याला आईचे दूध मिळू शकले नव्हते. बाळासाठी आईचे दूध हे अमृत मानले जाते. बाळाचा सर्वांगीण विकास, पोषण, गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यात आईचे दूध महत्वाची भूमिका बजावत असते. बाळाचे जन्मतः पचन कमजोर असते पण आईचे दूध त्याला सहज पचते.

आपल्या बाळाला आपण स्तन्य देऊ शकलो नाही या भावनेने आणि अन्य मुलांवर अशी वेळ येऊ नये यासाठी लिल यांनी २०१३ मध्ये प्रयोगशाळेत स्तन पेशी तयार करण्यास सुरवात केली.२०१९ मध्ये खाद्य वैज्ञानिक मिशेल एग्ज यांच्या सहकार्याने लीला यांनी BioMilk नावाची ही स्टार्टअपने सुरु केली. लीला सांगतात, ज्या माता मुलांना आपले दूध देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी काही पर्याय हवा अशी भावना यामागे आहे. ब्रेस्ट फिडींग संपविणे हा त्यामागचा हेतू नाही. येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात येईल असे समजते.

Web Title – BioMilk Startup प्रयोगशाळेत बनवले आईचे दूध ( Breast milk made in the laboratory )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

मराठी भाषादिनी रंगला ठाण्यात Udyam Thane – उद्यम ठाणे परिवाराचा अनोखा सोहळा

Web News Wala

Mera Ration app घरबसल्या बघा तुमच्या रेशनकार्ड किती धान्य मिळणार

Web News Wala

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोफत शिक्षण

Web News Wala

Leave a Reply