Team WebNewsWala
सिनेमा

ब्रह्मास्त्र २५-३० मिनिटांचा भाग काढणार दिग्दर्शक व निर्मात्यांमध्ये मतभेद

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेत सतत अडथळे येत आहेत. २०२० मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आधी एका वर्षाने पुढे ढकलण्यात आला.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेत सतत अडथळे येत आहेत. २०२० मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट आधी एका वर्षाने पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता चित्रपटातील जवळपास २५ ते ३० मिनिटांचा भाग काढून टाकण्याचा आग्रह निर्माते करत असल्याची माहिती समोर येतेय. यावरून निर्माते व दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.

मल्टिस्टारर ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट तीन तासांचा होत असून सहनिर्मात्यांचा त्याला विरोध आहे. “आजच्या काळात तीन तासांचा चित्रपट कोणी पाहत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईला फटका बसू शकतो”, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. मात्र तो भाग चित्रपटातील कथेचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचं अयानने स्पष्ट केलं. त्यामुळे आता निर्माते नेमका काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रणबीर-आलियाच्या चित्रपटातील अडचणी काही केल्या कमी होईना

‘ब्रह्मास्त्र’ मध्ये रणबीर कपूरआलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. पहिल्यांदाच ही जोडी ऑनस्क्रीन एकत्र काम करणार आहे. त्यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

१५० ड्रोनच्या साहाय्याने आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित

कुंभमेळ्यात या बिग बजेट चित्रपटाचा लोगो प्रदर्शित करण्यात आला होता. कुंभमेळ्यात जमलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि १५० ड्रोनच्या साहाय्याने आकाशात ‘ब्रह्मास्त्र’चा लोगो प्रदर्शित झाला. यावेळी आलिया आणि रणबीरच्या चित्रपटातील भूमिकांची नावंही जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार चित्रपटात आलियाचं नाव इशा आणि रणबीरचं नाव शिवा असं असणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

चित्रपटाची कमाई जाणून तुम्हाला काय करायचंय ? पंकज त्रिपाठी

Team webnewswala

धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत

Team webnewswala

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमा रिलीजला स्थगिती

Team webnewswala

Leave a Reply